माथेरान,

नागरीकत्व कायद्याविरोधात माथेरानमध्ये  मुस्लीम समाजाने मोर्चा काढून आपला विरोध दर्शविला.  ळे नागरिकत्व दुरूस्ती कायदा एन.आर.सी.आणि एन.पी.आर. कायदा रद्द करावा यासाठी मुस्लीम समाजाच्या वतीने दि.17 रोजी सकाळी 10 वाजता अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत सर्व मुस्लीम बांधवांनी अधीक्षक बी.बी. भोई यांना निवेदन सादर केले आहे.यावेळी मुस्लीम समाज अध्यक्ष नासीर शारवान, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे,नगरसेवक शकील पटेल, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांसह विविध सामाजिक संस्था, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा