खारेपाट ,

  महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने एल ई डी लाईटच्या पर्ससीन नेट तात्काळ बंद कराव्यात. अशी अलिबाग तालुक्यातील रेवस-बोडणी कोळी बांधवांची जोरदार मागणी होत आहे. 

 एल ई डी लाईटमुळे पारंपारिक मच्छीमारी करणार्‍या मच्छिमार बांधवांना समुद्रात मच्छी मिळत नसल्याने सुमारे 1 महिना रेवस बंदरात शेकडो बोटी नांगरल्या आहेत त्यामुळे आज मच्छीमार बांधवांंची दयनीय अवस्था झाली असून बेकारी निर्माण झाली आहे. कौटुंबिक गरजा भागविणे कठीण होत आहे. रेवस बोडणी परिसरातील सुमारे 300 मोठया बोटी टॉलर असून लहान होडया 70 हुन अधिक आहेत. कोळी बांधवांचे प्रश्‍न सुटण्याकरिता जिल्हा प्रशासन राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे मत मल्हारी मार्तड रेवस- बोडणी मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमण विश्‍वास कोळी यांनी व्यक्त केले.

महत्वाचे म्हणजे रेवस बोडणी कोळी बांधवांन कडून व्यक्त केले जाते कि ए ई डी लाईट संदर्भात शासनाकडून अमलबजावणी होऊनही आज तालुक्यासह जिल्हात काही ठिकाणी समुद्रात एल ई डी लाईट लावून पर्ससीन नेटद्वारे मच्छी  अवैधरित्या पकडली जाते. विशेष म्हणजे एल. ई.डी लाईटद्वारे मच्छी पकडली जाते व मच्छीची अंडी व लहान-मोठी मच्छी पकडली जाते. जर एल ई डी लाईट पर्ससीन नेट असेच सुरू राहिले, तर जसे शेतकरी आत्महत्या करतात, तशीच वेळ आता कोळी बांधवांवर आली आहे. तसेच कोळी बांधवांची समुद्र हिच शेती असून, राज्य शाससनाने, शेतकर्‍याप्रमाणे मच्छीमार बांधवांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.  तसेच पर्ससीन नेटद्वारे मच्छिमारी करणार्‍यांवर शासनाने तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

अवश्य वाचा