पाली-बेणसे 

       माध्यमिक शाळा शिहूचे मुख्याध्यापक, रायगड जिल्हा कबड्डी असोशिएशनचे सहकार्यवाहक जे.जे.पाटील सर महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. तांत्रिक व नियम समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएनचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या महत्वपुर्ण बैठकीत जे.जे. पाटील सर यांची एकमताने सदर निवड करण्यात आली. तसेच प्रो कबड्डीचे राष्ट्रीय पंच सुहास पाटील सर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळ सदस्यपदी नियुकत् करण्यात आली आहे. या निवडीनंतर जे.जे. पाटील सर, सुहास पाटील सर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

        जे.जे. पाटील सर यांना कबड्डी क्षेत्रातील भिष्माचार्य म्हणून ओळखले जाते. कबड्डी क्षेत्रात सलग 30 वर्षाचा दांडगा अनुभव, महाराष्ट्र शासनाचा गुणवंत क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार, तसेच रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भुषण पुरस्कार आदिंसह सामाजिक, शैक्षणिक व कलाक्रिडा क्षेत्रातील विविध नामांकित सामाजिक संस्थेच्या पुरस्कारांनी जे.जे.पाटील सरांचा गौरव झाला आहे. जपान आणि थायलंड या देशातील कबड्डी संघाचे समन्वय भुमिका बजावली. उत्कृष्ट क्रिडापट्टू ते महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. तांत्रिक व नियम समितीच्या अध्यक्षपदार्यंतची त्यांची यशस्वी वाटचाल राहिली आहे. जे.जे. पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे असंख्य राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले असून विविध प्रशासकीय सेवेत त्यांना काम करण्याची  संधी मिळाली आहे.

      रायगड जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो. रायगड जिल्हय्याच्या मातीतून राज्य व देशाला यापुढेही दर्जेदार व राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारे सक्षम खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याची ग्वाही जे.जे.पाटील सर यांनी दिली. जे.जे.पाटील सरांच्या या निवडीनंतर त्यांचे आ. धेर्यशिलदादा पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. सरकार्यवाहक ऍडः आस्वाद पाटील, गावदेवी मुंढाणी संघाचे कर्णधार दिनेश महादेव  घासे , पुरोगामी युवक संघटनेचे पेण तालुका उपाध्यक्ष जयराम म्हात्रे, कबड्डी पंच विजय भोईर, महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशिल सावंत, द्वारकानाथ पाटील, सुभाष घासे तसेच महाराष्ट्र राज्य व रायगड जिल्हा कबड्डी असोशिएशनचे सर्व पदाधिकारी, सभासद , तसेच पंच व कबड्डीप्रेमींनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली