नागपूर 

राज्यातील भीमा कोरेगाव प्रकरणी एकीकडे पोलिस महासंचालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. असे असतानाच दुसरीकडे मात्र एनआयए संदर्भात कोणतेही अधिकृत पत्र गृहमंत्रालयाकडे आलेच नाही, असा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरमध्ये केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. सोमवारपासून एनआयएचे पथक दिल्लीहून पुण्यात दाखल झाले आहे. मात्र, पुण्याच्या पोलिसांनी एनआयएच्या पथकाला चौकशीचे कागदपत्र देण्यास नकार दिला.

या पार्श्‍वभूमीवर माहिती देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, भीमा कोरेगाव प्रकरणी एनआयए चौकशी करणार आहे. याबाबतीत केंद्र सरकारकडून अद्यापही पत्र आले नाही. एनआयएच्या चौकशी संदर्भात प्रसारमाध्यमांकडूनच कळले. केंद्र सरकारकडून पत्र आल्यानंतरच पुढचा विचार करून निर्णय घेऊ, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.