अलिबाग 

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाचे रायगड जिल्ह्याचे 45 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन खालापूर तालुक्यातील हाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. 31 जानेवारी 2020 ते 2 फेब्रुवारी 2020 रोजी या कालावधीत हे प्रदर्शन पार पडणार आहे.

शाश्‍वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्. विषय आहे.   रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रायगड अलिबाग व जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त  विद्यमाने हाळ येथील याक पब्लिक हायस्कुल येथे हे प्रदर्शन होईल.  या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 31 जानेवारी  रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री तथा उद्योग,खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन,क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे याच्या उपस्थितीत होईल. या सोहळ्याला शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, आम.बाळाराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पक्ष प्रतोद तसेच जिप सदस्य आस्वाद पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

समारोप व पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी  साडेतीन वाजता रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा कु. योगिता पारधी, व रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सुधाकर घारे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे, असे भाऊसाहेब थोरात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.