श्रीवर्धन 

येथील गोखले महाविद्यालयात नुकतेच पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार, पोलीस निरीक्षक

प्रमोद बाबर, विकास समितीचे सदस्य दादासाहेब भोसले व शांतीलाल जैन, नितीन सुर्वे, भारत चोगले आदी उपस्थित होते. उप प्राचार्य प्रा. सुभाष भोसले यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करुन दिला. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. कल्याणी नाझरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सोहळ्याचे प्रयोजन व रुपरेषा सांगितली. त्यानंतर विविध विभाग प्रमुखांनी अहवाल वाचनांतून विविध कामांचा आढावा घेतला.

प्रा. एस. आर. भोसले, प्रा. व्ही. आर. जोंधळे, प्रा. आर. बी. गोरुले, प्रा. सौएम. एम. भुसाणे यांचा गुणवंत प्राध्यापक म्हणून तर मिलिंद काप यांचा गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला. यशप्राप्त विद्यार्थ्यांचे बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले.

श्रावणी रटाटे व  पंकज जाधव यांचा जनरल चँपियन, गैबी सुबैय्या हिचा बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. अंतिम वर्षामध्ये विद्यापीठाच्या परीक्षेत सर्वाधीक गुण प्राप्त करणार्‍या सोनम पेडणेकर हिला माजी विद्यार्थी संघामार्फत दिली जाणारी ट्रॉफी देण्यात आली. कुंदनशेट व मोहनशेट जैन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोख बक्षिसे शांतीलाल जैन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रा. एन. एन. जावळेकर व प्रा. एस. एच. भोईरयांनी संचालन केले. प्रा. सौ. डी. एन. पाठराबे यांनी आभार मानले. 

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.