उरण 

भारतीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगद्वारे होणार्‍या  परीक्षांचे महत्व जाणून, त्या परीक्षांना बसणाऱयांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. यासाठी उरणमध्येही या स्पर्धा परीक्षेसाठी 2 फेब्रुवारी रोजी विनामूल्य प्रशिक्षण आयोजित केले आहे.

डॉ. रविंद्र शिसवे , खझड, सहपोलीस आयुक्त, पुणे. याच्या संकल्पनेतून प्रेरीत होऊन णझडउ,चझडउ स्पर्धा परीक्षांची तयारी साठिचे (ख-ड,खझड,खठड,खऋड, उज,ऊधडझ,ऊध. उजङङएउढजठ) *विनामूल्य प्रशिक्षण उपक्रम* रविवार दि.  2 फेब्रूवारी 2020 रोजी सकाळी 10:00 ते दु. 2:00 पर्यंत वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथे आयोजित करण्यात आले आहे.

वरील परीस्थितीचा विचार करून  आपल्या विभागातील आपल्या विद्यार्थ्यांना  या परिक्षांचे महत्व  तसेच प्रशासकीय नोकरी आणि त्याचे महत्व कळावे या करिता जे गेले काही वर्षे या संदर्भात विद्यार्थ्यांना आगदी निस्वार्थ भावनेने फार मोलाचे मार्गदर्शन करत आहेत, ते मा. डॉ. रविंद्र शिसवे यांचे मोलाचे मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून  लाभणार आहे.

डॉ. रविंद्र शिसवे साहेब यांचे मार्गदर्शन म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव तर असणारच आहे पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सकारात्मक  जाणीवा जागृत करून त्यांना  यशाच्या मार्गावर नेणारा देखील ठरणार आहे.

तरी या शिबीराचे अनन्य साधारण महत्व ओळखून या सुवर्ण संधीचा आपल्या तालुक्यातील ईच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुधाकर  पाटील 9819238522, संतोष पवार 9619326944 व राजेंद्र मढवी 9967096513 यांनी केले आहे.

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.