मुरूड 

मुरुड - अलिबाग सकाळी 6:15 ची एस. टी. बस ही बस सकाळी विद्यार्थ्यांसाठी एकमेव पर्याय आहे. ही बस आज सकाळी नेहमीप्रमाणे नादुरुस्त झाली. याचा फटका वृत्तपत्र विक्रेत्यांना, शाळेल, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, कोर्लई येथुन येणार्‍या भाजी विक्रेत्यांना तसेच नांदगाव व मुरुड येथे येणार्‍या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहचण्यासाठी 40 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना चक्क पाच किलोमिटर पायपीट करावी लागली.

मुरुड एस.टी. डेपोची दुरवस्था झाली आहे. सर्व जुन्या बस भंगारात काढण्याची स्थिती आहे. जुन्या असल्याने वारंवार या बस नादुरुस्त होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज त्रास सहन करावा लागतो. अशीच घटना आजही घडली. आज सकाळी 6:15 वाजता अलिबाग येथुन सुटणारी सकाळच्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्वपुर्ण बस आहे. ही मुरुड एस.टी बस नेहमीप्रमाणे सकाळी 6:15 वाजता सुटली. या गाडीत नेहमी मुरुडसाठी वृत्तपत्रांचे गठ्ठेसुद्धा असतात. मुरुडला शिक्षण घेण्यासाठी रेवदंडा, साळाव, कोर्लई, बोर्ली-मांडला, बार्शीव, काशिद, सर्वे, नांदगावदांडे, नांदगाव, मजगाव, येथिल विद्यार्थी नेहमी मुरुडला येण्यासाठी या गाडीचा वापर करतात. त्यामुळे सुमारे 40 ते 45 विद्यार्थी या गाडीत असतात. या पहील्या गाडीशिवाय दुसरा पर्याय नसतो. कोर्लई येथुन अनेक भाजी विक्रेत्या महीलांची गर्दी, तसेच नांदगाव, मुरुड या ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थींची गर्दी रोजच होत असते. ही गाडी सर्वे गावचा अवघड घाट चढल्यानंतर उतरत असताना अचानक नादुरुस्त झाली. त्यानंतर पर्यायी गाडीची व्यवस्था न झाल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली.

 

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.