नेरळ 

नेरळमधील टिपणीस महाविद्यालयात 26 जानेवारी रोजी पदवी प्रमाणपत्र प्रधान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

नेरळमधील मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालयात 26 जानेवारी रोजी महाविद्ययाच्या परिक्षा विभागाद्वारे शैक्षणिक वर्ष 2018-19 या वर्षात पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या सोहळ्याला विद्या मंदिर मंडळ संस्थेच्या सर्व सन्माननिय पदाधिकार्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी वेशभुषा परिधान करुन मान्यवरांच्या समवेत संचलन करुन महाविद्यालयाच्या नुतन इमारतीत प्रवेश केला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, प्रा.सागर मोहिते, विद्या मंदिर मंडळ संस्थेचे  कार्याध्यक्ष, एस.एस फडकर, सदस्य सुर्यकांत जाधव, चंद्रशेखर देशमुख, मिलिंद पोतदार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रा. संतोष तुरुकमाने यांनी माजी विद्यार्थ्यांची महाविद्यालयाप्रती असलेली भुमिका आणि त्याच्या कार्याबद्दल माहिती दिली.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.