दिनांक 29 जानेवारी 2019

इतर दिनविशेष :

1274 - संत ज्ञानेश्‍वरांचे मोठे बंधू आणि गुरु श्रीनिवृत्तीनाथ यांचा जन्म.

1700 - प्रसिद्ध स्वीस गणिती डॅनिअल बर्नूला यांचा जन्म.

1737 - मर्यादित राज्यसत्तेचा पुरस्कर्ता असलेला साहित्यिक, मानवतावादी लेखक, धर्मसुधारक टॉमस पेनांचा जन्म

1870 - भारतातील पहिले वर्तमानपत्र ‘कोलकाता जनरल ऑडन्हर्टायझर’ जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरु केले.

1881 - सुक्ष्मजंतू शास्त्रज्ञ ऑलीस कॅथेर्नन  इव्हान्स यांचा जन्म.

18 व्या शतकात युरोपात प्रबोधनाची लाट निर्माण झाली. ह्या लाटेत युरोपचे मध्ययुग वाहत जाऊन आधुनिक युगात त्याचे रुपांतर झाले. या आधुनिकतेत टॉमस पेनचा वाटा फार मोठा आहे. टॉमस हा इंग्रजी लेखक असूनही इंग्लंडच्या विरोधातच तो टीका करत असे हे त्याचे वैशिष्ट्य. त्याचा जन्म 29 जानेवारी, 1737 रोजी झाला. आयुष्यभर लेखनाद्वारे प्रबोधन करण्यासाठी तो स्वतः हालाखीत राहत होता. खिस्ती धर्मावर रोखठोक टीका करणारा तो पहिलाच मानवतावादी लेखक होय. धर्माची चिकित्सा करून धर्मसंस्थेचे  भयानक स्वरूपाचे त्यांनी विश्‍लेषण केले. मात्र त्याचे  विचार धर्मभावना नष्ट करण्याचे नसून धर्मशुद्धी  करण्याचे होते. परमेश्‍वर आणि मानव यांच्यात कुणीही मध्यस्थ नसावा या विचारप्रणालीनुसार त्याने चर्चला नाकारले. तो बुद्धिवादाचा समर्थक होता. त्यासंबंधीचे ‘द एज ऑफ रिजन’ हे पुस्तक गाजले. परिणामी सनातनी लोकांनी त्याला नास्तिक ठरवले व त्याची हत्या करण्याची योजना केली.

फ्रेंच राज्यक्रांती 1785 मध्ये सुरू झाली. क्रांतीला हिंसक वळण लागत होते. या घटनेवर ब्रिटिश संसद सदस्य एडमंड बर्क याने फ्रेंच राज्यक्रांतीवर टीका केली. तेव्हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाजूने ‘द राईटस ऑफ मॅन’ हे पुस्तक त्याने लिहिले. या ग्रंथात त्याने मानवी हक्कांची तरफदारी केल्याने खळबळ माजली. आधीच सनातन्यांचा रोष, त्यात राजकारण्यांची भर... त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून फासावर चढविण्याचा सरकारचा विचार होता. पण या गोष्टीचा सुगावा लागताच तो फ्रान्सला पळाला. फ्रान्समध्ये तो 1792 ला नॅशनल कन्व्हेन्शनचा सदस्य झाला. फ्रेंच राज्यक्रांतीत मवाळ नेता म्हणून त्याने काम केले. त्याने असे घोषित केले की, सर्व क्रूर सत्ताधीशांपेक्षा  एक प्रामाणिक नांगरधारी शेतकरी श्रेष्ठ आहे. तथापि 16 व्या लुईचा वध केल्यामुळे जँकोबिन पक्षावर त्यांने टिका केली होती. रज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये अराजकता माजली होती व हा कालखंड दहशतीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. क्रांतीच्या विरोधात असणार्‍यांना साध्या संशयावरुन ‘गिलोटिन’’ या यंत्राने ठार मारण्यात येत असे. त्यामुळे पेन हा फ्रेंच राज्यक्रांतीचा विरोधक असल्याचे समजून त्याची रवानगी गिलेटिनवर करण्यात येणार होती. तथापि जॅकोविन पदाचा नेता रॅबेल्छिअर यालाच पकडून गिलेटिनवर चढविल्याने पेन वाचला आणि फ्रान्स सोडून तो अमेरिकेत आला.

अमेरिका ही त्याची कर्मभूमी ठरली. अमेरिकेतल्या पेन्सिलव्हिनिया  मॅगेझिनच्या संपादनाची जबाबदारी त्याने सांभाळली. ‘कॉमनसेन’ या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकन लोकांना सांगितले.  ब्रिटिश राजा तिसरा जॉर्ज यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा करु  नका.’ पेनने ब्रिटीश राजाला राजपशू तर पार्लमेंट सदस्यांची संभावना निर्बुद्ध म्हणून केली. वसाहती जर ब्रिटिश जाचातून मुक्त झाल्या तर त्यांचा व्यापार वाढून त्या वैभवसंपन्न बनतील. त्याच्या ‘पब्लिक गुड’ या पुस्तकातून ब्रिटिशांशी लढण्यासाठी बळकट संघराज्य तयार करण्याचे आवाहन केले. हजारो मैल अंतरावर असलेल्या ब्रिटिश देशाने (इंग्लंड) अमेरिकेसारख्या एका खंडप्राय देशावर राज्य करावे ही बाबच मुळी लांच्छनासपद आहे. ह्या त्याच्या विधानाने अमेरिकन लोक लढण्यास तयार झाले, है कित्येक अमेरिकन इतिहासकारांनी मान्य केले आहे. स्वतंत्र अमेरिकेत त्यांनी निग्रोच्या गुलामगिरीला तीव्र विरोध केला.

‘डझर्टेशने ऑन द अपेअस ऑफ द बँक’ हा अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहून भांडवलशाही मक्तेदारीला विरोध केला. राज्यसत्तेेची पकड माफक असावी व तिचा उपयोग सर्वसामान्यांच्या हिताकरता व्हावा हा विचार त्याने ‘अगेटिअन जज्टिज’ या ग्रंथात मांडला. मर्यादित राज्यसत्तेचा  पुरस्कर्ता असणार्‍या टॉमस पेनला अमेरिका व फ्रेंच राज्यघटनेत मानाचे स्थान आहे. इंग्लंडलासुद्धा 1832 च्या सुधारणा कायद्यात त्याच्या साहित्याची दखल घेणे भाग पडले. त्याचे विचार आजही घटनेत दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. गरिबीत जीवन कंठीत 8 जून, 1809 रोजी नियॉर्क येथे पेनची लेखणी कायमची थांबली.

(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.