म्हसळा 

दैवज्ञ समाज गणेश मंदिर ट्रस्ट म्हसळा यांच्या विद्यमाने म्हसळा येथील श्री गणेश मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने मंगळवारी रोजी पहाटे सहा वाजता श्रींची अभिषेक पूजाविधी,दैवज्ञ समाज महिला मंडळ यांचे संगीत भजन,सिद्धीकला भजन मंडळाचे संगीत भजन,दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता श्रींचे पूजन,श्री सत्य नारायण महापूजा आणि रात्री भाविकांच्या मनोरंजनार्थ प्रफुल पाटील आणि ग्रुप अलिबाग यांचा ऑर्केस्ट्रा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे.

माघी गणेशोत्सवानिमित्त रोहा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार मंदार भावे यांच्या सुस्वर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.मंदार भावे यांनी मानवाचा जन्म ते त्याचा मृत्यू या मधील प्रवासाचे सविस्तर वर्णन करून मिळालेल्या मानव जीवनाचे सार्थक कसे करता येईल या बाबत भक्तांना सविस्तर प्रबोधन केले.जीवनात चांगले कर्म करणार्‍या व्यक्तीचे जीवन सफल होते असेही कीर्तनकार मंदार भावे यांनी सांगितले.

या उत्सवाच्या कार्यक्रमास दैवज्ञ समाज अध्यक्ष सुनील उमरोठकर, प्रसाद पोतदार,कमळाकर करडे,हिंदू समाज अध्यक्ष बालशेठ करडे,गौरव पोतदार,दिलीप करंबे,महेंद्र पोतदार,गौरी प्रसाद पोतदार,सुलभा करडे,प्रतीक गोविलकर,निता ढवळे, वत्सला पाटकुळे,पांडुरंग लिमकर,गजानन पानसरे,प्रदिप गोविलकर,विलास यादव,सुरेश कुडेकर,समीर करडे,सचिन करडे,नरेंद्र पोतदार,मयूर ढवळे आदि मान्यवर उपस्थित होते.

फोटो-माघी गणेशोत्सवानिमित्त म्हसळा येथील गणेश मंदिरात रोहा येथील कीर्तनकार मंदार भावे सोबत श्री गणेश भक्त(छाया-उदय कळस,म्हसळा)

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली