माणगाव 

 रिक्षा चालक मालक संघटना माणगाव यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही दि. 27 जानेवारी 2020 रोजी श्री.सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न झाली.यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे, भाविकांचे,संघटनेचे तालुक्याचे  संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजयअण्णा साबळे व सहकारी रिक्षा चालक मालक यांनी गुलाबपुष्प देऊन  स्वागत केले.

रात्री काळभैरव भजन मंडळ होडगांव बुवा नथुराम साखरे यांच्या भजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.सदर पूजेचा कर्यक्रम संपन्न करण्यासाठी  संघटनेचे तालुक्याचे  संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजयअण्णा साबळे व तालुका कार्याध्यक्ष  उदय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ता.सल्लागार नरेश सावंत,पराग सावंत,नामदेव खराडे,विजय पडवळ,प्रशांत खरे, प्रकाश मोरे,विलास वेदक,दिनेश महाडिक,अनिल शिंदे,हुसेनमिया वजगरे,निलेश कडू ,सुनील अर्बन,चेतन गावणकर यांच्यासह संघटनेच्या  सर्व पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.