उरण 

ओएनजीसी कंपनी प्रकल्पग्रस्तांवर गेली अनेक वर्षे अन्याय करीत आली आहे. याबाबत अनेक तक्रारी, मोर्चे, निदर्शने करूनही न्याय मिळत नसल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी ओएनजीसी कंपनी समोर उपोषणास सुरुवात केली आहे.

1986 सालापासून जिल्हाधिकारी व सिडको कार्यालयातून प्रकल्पग्रस्तांचा रीतसर प्रस्ताव देऊनही कंपनी प्रशासन प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडत आहे. त्याच्या निषेधार्थ ओएनजीसी विस्थापित एकता कमिटी तर्फे सोमवारपासून ओएनजीसी गेटसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषण कर्त्यांना माजी जिप सदस्य चारुदत्त पाटील, जितेंद्र घरत यांच्यासह अनेकांनी पाठींबा दर्शविला आहे. न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरू राहील असे उपोषणकर्ते कमळाकर कडू यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली