माणगाव 

सहकार क्षेत्रात रायगड जिल्हयात नांवलौकिक कमाविलेल्या माणगांव ग्रामीण  बिगरशेती सहकारी सहकारी पतसंस्था मर्यादित उतेखोल ता. माणगांव या संस्थेच्या एकविसावा वर्धापनदिन शनिवार दि.1 फेब्रुवारी  रोजी साजरा होणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा व हळदी कुंकू कार्यक्रम संस्था कार्यालय चौधरी  कॉम्पलेक्स निजामपूर रोड माणगांव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी सहकुटूंब, सहपरिवार, आतेष्ट व मित्रमंडळीसह उपस्थित राहून सायंकाळी 5 ते रात्री 9 यावेळेत तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक अँड.राजीव साबळे, चेअरमन तथा  माणगांव  नगरीचे  माजी नगराध्यक्ष  तथा विद्यमान नगरसेवक  आनंदशेठ यादव , व्हा. चेअरमन मदनलाल जैन, सर्व संचालक,  कर्मचारी वृंद व स्वल्पबचत  प्रतिनिधी यांनी केली आहे.

 माणगांव ग्रामीण पतसंस्था हि रायगड जिल्हयातील नामांकित पतसंस्थापैकी एक ओळखली जाते याठिकाणी ठेवींना आकर्षक असा व्याजदर असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकृत विजबिल भरणा  केंद्र आहे तसचे अत्यल्प दरात देशात कोठेही देय असणारे डी. डी. सुविधा येथे उपलब्ध असून ज्येष्ठ नागरीकांस 1 टक्के जादा व्याजदर आहे. या पतसंस्थेची स्वत:च्या मालकी हक्काची इमारत असून हि संस्था सर्वांच्याच अशिर्वादाने भरभराटीला आली आहे. दरवर्षी या पतसंस्थेचा वर्धापन दिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा  केला जातो.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.