अलिबाग 

लायन्स अलिबाग फेस्टिवलच्या रंगमंचावर एक एक मॉडेल नजाकतीने पावले टाकत (रॅम्प वॉक) येते... मग ते मॉडेल बालक-बालिका असो वा तरुण-तरुणी असो, उपस्थित रसिकांच्या ह्रदयावर मखमली पावलांनी चालत असल्याचा भास होतो... त्या मॉडेल्सच्या मेकअप आणि केसांच्या विविध स्टाइल्स, नेत्रसुखद प्रकाशयोजना पाहून हे वास्तव आहे की भ्रम आहे, हाच संभ्रम उपस्थितांना होतो... फॅशन टीव्हीवर एखादा कार्यक्रम पहात असल्याचा प्रत्यय पॅशनचे आंतरराष्ट्रीय हेअर अ‍ॅण्ड मेकअप आर्टिस्ट अमित वैद्य यांच्या सादर होत असलेल्या या ‘हेअर अ‍ॅण्ड मेकअप शो’ने येत होता. म्हणूनच त्यांनी या शोचे नाव इल्युशन म्हणजेच भ्रम असे ठेवले होते.

होय, शनिवार, 25 जानेवारीची रात्र धुंद, मंतरलेली होती. कारण रायगड जिल्ह्यामध्ये दुसर्‍यांदा अलिबाग येथे लायन्स अलिबाग फेस्टिवलच्या 2 र्‍या दिवशी, रात्री 7-30 वाजता वाजता रंगमचावर अमित वैद्य यांच्या अलिबागेतील पॅशन एज्युकेशन फाऊंडेशन, पॅशन इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ हेअर ब्युटी अ‍ॅण्ड  मेकअप व पॅशन सलोन, स्पा ऍण्ड मसाज प्रस्तुत आंतराष्ट्रीय दर्जाचा ‘हेअर ऍण्ड मेकअप शो- ‘इल्युशन’  सादर झाला. या शोमुळे हेअर अ‍ॅण्ड ब्युटी, मेकअप इंडस्ट्री किती उच्चस्थानी पोहोचली आहे, हे दिसून आले. या शोमध्ये एकूण 60 मॉडेल्सवर विविध प्रकारच्या हेअरस्टाईल्स व मेकअप करण्यात आले होते. त्यामध्ये देशातील विविध राज्यांतील वधु-वरांचा लग्नाचा साजशृंगार विविध संस्कृतींची ओळख करुन देणारा ठरला. त्याबरोबरच वेस्टर्न हेअरस्टाईल, अवंत गार्डे हेअरस्टाईल, फॅण्टसी हेअरस्टाईल, ट्रडिशनल ब्राईड, जेन्टस स्टायलिंग, जेन्टस हेअर टॅटू शा विविध प्रकारच्या हेअरस्टाईल्स दाखवण्यात आल्या. या सर्व हेअरस्टाईल्स व त्यावरील फुले अमित वैद्य व त्यांच्या आर्टिस्टनी तयार केली होती. या सगळ्या हेअरस्टाईल व मेकअप भारतातील ठराविक महानगरांत दाखवल्या जातात. रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये दुसर्‍यांदा त्याच रंगमंचावर असा शो रसिकांना पहायला मिळणे खरोखरच भाग्याचे होते. कारण असे मोठे शो महानगरांत होतात, किंवा टीव्हीवरच पहावे लागतात, परंतु ‘पॅशन’चे आंतरराष्ट्री हेअर अ‍ॅण्ड मेकअप आर्टिस्ट अमित वैद्य यांच्या सौजन्याने हा शो ‘याची देही याची डोळा’ रसिकांना अगदी जवळून पाहता आला.

अडीच तासांच्या या ‘हेअर अ‍ॅण्ड मेकअप शो’ची तयारी पॅशनचे अमित वैद्य आणि त्यांच्या टीमने तीन महिने आधीपासून चालवली होती. या शोची सर्व हेअरस्टाईल, त्याचे संकल्पना, त्याचे डिझायनिंग अमित वैद्य यांनी केले होते. या शोसाठी ‘हेअर स्टाईल आणि मेकअप’ करण्यास त्यांच्या टीमला सात तास लागले. रविवारी, दुपारी 12 वाजता अमित वैद्य आणि त्यांच्या टीमने मॉडेल्सना ‘हेअर स्टाईल आणि मेकअप’ करण्यास सुरुवात केली. हे काम संध्याकाळी 7 वाजता संपले आणि 7-30 वाजता त्यांचे मॉडेल्स रॅम्पवर उतरले. हे मॉडेेल्स रायगड जिल्ह्यातीलच होते. हा शो यशस्वी करण्यासाठी जयेश पाटील यांची कोरिओग्राफी महत्वाची ठरली. अमित वैद्य यांच्याबरोबर पॅशनचे अनुभवी हेअर स्टायलिस्ट जगदीश पाटील, नितीश म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे, संदीप शिंदे, कल्पेश पांडव, मानसी नायक, प्रथमेश भोसले, स्वाती मोहिते, जान्हवी शास्त्री अशा एकूण 45 आर्टिस्टचा हा शो एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सहभाग राहिला.  तचेच या शोचे पोषाख डिझायनिंग लक्ष्मी मुकादम यांनी केले. तर ज्वेलरी डिझायनिंग देवश्री कलेक्शनची होती. तर संकेत नाईक, प्रणव पाटील, संदीप वाटवे यांचाही महत्वाचा सहभाग होता. विनित देव यांनी सूत्रसंचालन केले. हा ‘हेअर अ‍ॅण्ड मेकअप शो’ लायन अलिबाग फेस्टिवलच्या रंगमचावर सादर होत असताना, तो संपू नये असेच उपस्थित रसिकांना वाटत होते. पण कुठेतरी थांबावेच लागते, त्यातचे गोडी असते. त्यामुळे या कार्यक्रमाचा गोड समारोप स्वत: अमित वैद्य आणि त्यांच्या पत्नी विशाखा वैद्य यांनी रॅम्पवर उतररुन रसिकांना मानवंदना देऊन केला.

अमित वैद्य यांच्या ‘हेअर ऍण्ड मेकअप शो- ‘इल्युशन’साठी प्रमुख पाहुणे म्हणून अ अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक,माजी राजिप उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, राजिप सदस्य चित्रा पाटील,राजिम सह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांच्यासह लायन अलिबाग फेस्टिवल चेअरमन संजय पाटील, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, लायन्स क्लब, अलिबागचे अध्यक्ष रमेश धनावडे, महेंद्र पाटील, सुबोध राऊत, अनिल म्हात्रे, प्रवीण सरनाईक, गजेंद्र दळी, नयन कवळे, अनिल जाधव आदी उपस्थित होते.

 

 

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली