पोलादपूर 

तालुक्यातील भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम शहरातील मैत्री सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी पोलादपूर तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, पंचायत समितीच्या सभापती नंदाताई चांदे, मोरगिरी सरपंच शरदबुवा जाधव, सडवली उपसरपंच बापू नाना जाधव, महाड कृउबा समितीचे संचालक तथा बोरावळे सरपंच वैभव चांदे, निवृत्ती उतेकर तसेच मनोहर पार्टे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या विभागिय चिटणीसपदी भाई योगेश महाडिक यांची फेरनिवड तसेच पोलादपूर तालुका युवक अध्यक्षपदी भाई हर्षल सातपुते, पोलादपूर तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्षपदी भाई यासिन करबेलकर, रायगड जिल्हा क्रीडा सेल सदस्यपदी भाई समीर चिपळूणकर, रायगड जिल्हा महिला आघाडीच्या सदस्यपदी सौ. संगिता योगेश महाडिक, पोलादपूर तालुका विधी सेल उपाध्यक्षपदी भाई संकेत म्हस्के, रायगड जिल्हा अनुसूचित जाती सेल सदस्य रवींद्र भा.गायकवाड, रायगड जिल्हा कला व सांस्कृतिक सेल सदस्यपदी भाई एकनाथ मांढरे, पुरोगामी युवक संघटना पोलादपूर सदस्य व पोलादपूर तालुका व्यापारी सेल उपाध्यक्षपदी भाई सोहेल करबेलकर, पोलादपूर तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी सौ. छाया गणेश गोगावले, पोलादपूर तालुका अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्षपदी विलास भागुराम सकपाळ, पोलादपूर तालुका आपत्कालीन व्यवस्था सेल सदस्यपदी संकेत शरद जैतपाल, पोलादपूर तालुका विद्यार्थी संघटनेच्या सदस्यपदी स्वप्नील लक्ष्मण सुतार, पोलादपूर तालुका अल्पसंख्याक सेल सदस्यपदी अमीर अहमद तिवडेकर यांची निवड करण्यात आल्याची पत्र व्यासपिठावरील मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आली.

पोलादपूर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाची संघटना दिवसेंदिवस मजबूत होण्यासाठी तरूणांच्या जनसंपर्क क्षमतेचा उपयोग होत असून आगामी काळात पोलादपूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्‍वास यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा पोलादपूर तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली