पेण 

सामाजिक जाणिवेतुन हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने राजेश अनगत व त्यांच्या सहकार्‍यांच्या पुढाकाराने  प्रजासत्ताक दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय पेण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक प्रशांत ओक, डॉ.अशोक भोईर, डॉ.सौरभ सुर्यवंशी, रमेश खरे, अनिल कांबळे, हॅपी थॉट पेणचे राजेश अनगत, रामचंद्र साळुंखे, राजु सावंत, तेजपाल सिंग, जय प्रकाश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. 6 वर्षे सातत्य राखत रक्तदान शिबीर राबविणे हे एक आवाहन असुन या शिबिरातुन अनेक जणांना या रक्ताचा उपयोग होणार आहे. आज अनेक ठिकाणी अपघात झाल्यास अपघात ग्रस्तांना किंवा गरजु रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते यावेळी हे रक्ताचा उपयोग होणार असल्याने रक्तदानातून एक पुण्याचे काम रक्तदाते करीत असल्याने त्यांचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.

  या शिबिरात रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील डॉ. हेमकांत सोनार, वैद्यकीय अधिकारी डॉ. खोलवडीकर व डॉ.सौरभ सुर्यवंशी, परिचारिका पुनम पाटील व त्यांचे सहकारी उमेश पाटील, महेश घाडगे यांनी काम पाहिले. या शिबिरात एकूण 38 रकदात्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व हॅपी थॉट पेणच्या वतीने श्री ची पुस्तके भेट देण्यात आली. शेवटी सर्व उपस्थितांचे आयोजक राजेश अनगत यांनी आभार मानले व पुढील वर्षासाठी याहुन मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी जनजागृती करू असे आश्‍वासन व धन्यवाद दिले.  

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली