नागोठणे 

भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नागोठणे ग्रामपंचायतीच्या बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयात सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली ग्रामसभा गावातील  विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर खेळीमेळीच्या वातावरणात संपन   झाली. यावेळी ग्रामस्थांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांवर डॉ. मिलिंद धात्रक यांनी समर्पक उत्तरे देवून ग्रामस्थांची  मने जिंकली. दरम्यान गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणू असे अभिवचन रा.जि.प.सदस्य किशोर  जैन यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.

नागोठणे तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव यांचे काही महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या तंटामुक्त अध्यक्षपदी नागोठणे ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य व पत्रकार शैलैंद्र  देशपांडे यांची यावेळी बिनविरोध निवड करणायत आली.

नागोठणे ग्रामसभेत शुद्ध पाणी पुरवठा योजना, बापूसाहेब देशपांडे विद्या संकुल ते हॉटेल रुची बाजूच्या रस्त्या पर्यंत उड्डाण पूल बांधणे, मोटेच्या तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करणे, शौचालय टाकी साफ करण्यासाठी ग्रामपंचायतीने  गाडी खरेदी करणे, शिवगणेश हॉल नेहमी नागरिकांसाठी उपलब्द्ध करणे, शुंगार तलाव व कोंडाळ तलावाचे शुशोभीकरण करणे, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एम.बी.बी.एस. डॉक्टर आणण्यासाठी प्रयत्न करणे, मागास वर्गीय 15 टक्के अनुदान प्रत्येक वर्षी उपलब्द्ध करून देणे, शिवाजी चौकात शिव स्मारक उभारणे, ग्रामपंचायतीच्या सभागृहास बॅ. ए.आर.अंतुले सभागृह असे नामकरण  करणे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, भगवान महावीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हजरत मिराउद्दीन शाह बाबा आदी महापुरुष व दैवतांच्या नावाच्या  कमान उभारणे तसेच हजरत मिराउद्दीन शाह बाबा दर्गा येथील चौकाचे हजरत मीराउद्दीन शाह बाबा चौक व ग्रामपंचायत कार्यालयासमोरील चौकास छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करणे यांसह विविध विकास कामे ग्रामस्थांनी यावेळी सुचविली. या सर्व विकास कामंवर सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी योग्य उत्तरे दिल्या नंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

 या ग्रामसभेत  रा.जि.प. सदस्य किशोरभाई जैन, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, प.स.सदस्य बिलाल कुरेशी, उपसरपंच सुरेश जैन, जेष्ठ सदस्य शैलेन्द्र देशपांडे, माजी सरपंच विलास चौलकर, लियाकत कडवेकर, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब टके, सिराजभाई पानसरे, ग्रा.स. मोहन नागोठणेकर, अकलाक पानसरे, ज्ञानेशवर साळुंके, सौ.सुप्रिया महाडिक, माधवी महाडिक, सौ. रुपाली कांबळे, सौ.कल्पना टेमकर, सौ. रंजना राऊत, सौ. रोजाना बागवान, विनोद अंबाडे, असगर मुल्ला , रुचिर मोरे, नारायण भोईर(गुरुजी), उदंड रावकर, बापूसाहेब रावकर, दिनेश घाग, सुनिल लाड, अविनाश बामणे, शैलेश रावकर, कीर्तीकुमार कळस, पांडुरंग चौलकर, रवि वाजे, अनिल महाडिक, शेखर जोगत, मंजर जुईकर, आदींसह ग्रामस्थ बहु संखेने उप्स्थिउत होते.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग