पनवेल 

नोकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या कामोठे भागातील एका व्यक्तीला अज्ञात टोळीने नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्याच्याकडून 1 लाख 79 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन या टोळीचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणात फसवणुक झालेल्या व्यक्तीचे नाव श्रीराम रीसवुड (34) असे असून तो कामोठे सेक्टर-11 मध्ये कुटुंबासह रहाण्यास आहे. श्रीराम याला नोकरी नसल्याने त्याने दोन वर्षापुर्वी नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर नोकरीसाठी आपली माहिती टाकली होती. त्यानंतर गत डिसेंबर महिन्यामध्ये अज्ञात टोळीतील देवाराज मेहता नामक व्यक्तीने श्रीराम याला संपर्क साधून त्याची करीअर इंडीया डायस इंडीया या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात येत असल्याचे सांगितले होते. तसेच पुढील प्रोसेससाठी ुुु. लरीशशी वळलशळपवर.लेा या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी 4782 रुपये पाठविण्यास सांगितले होते. त्यानुसार श्रीरामने पैसे पाठविल्यानंतर सदर टोळीतील सदस्यांनी कमिशन म्हणुन व इतर प्रोसिजरसाठी पैसे भरावे लागतील असे सांगून त्याला ऑनलाईन रक्कम पाठविण्यास भाग पाडले.

त्यानुसार श्रीराम देखील नोकरी मिळेल या आशेने पैसे पाठवित राहिला. अशा पद्धतीने सदर टोळीने श्रीराम याच्याकडून 1 लाख 79 हजार 125 रुपयांची रक्कम उकळली. मात्र त्यानंतर देखील सदर टोळीकडून त्याला आणखी पैसे पाठविण्यास सांगण्यात येऊ लागले. त्यामुळे श्रीराम याला सदर टोळीबाबत संशय आल्याने त्याने पैसे पाठविणे बंद करुन त्याने पाठविलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र सदर टोळीतील सदस्यांनी आपले मोबाईल बंद केेले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीरामने कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात फसवणुक तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन या टोळीचा शोध सुरु केला आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.