सुधागड-पाली 

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पाली शहरासह संपूर्ण सुधागड तालुक्यात भारत मातेचा जयजयकार गुंजत होता. विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीत प्रत्येकाच्या हाती तिरंगा लहरत होता. पाली  तहसील कार्यालय येथेही मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

 सर्वप्रथम उद्देशपत्रिकाचे सामूहिक वाचन करून पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या शुभहस्ते भारत देशाचा तिरंगा फडकवून त्यांनी सलामी दिली. यावेळी रा जि प शाळा नवघर, ग. बा. वडेर विद्यालय व महाविद्यालय, रा जि प शाळा राबगावं, कन्या शाळा पाली, तसेच अविनाश झोरे  डान्स ग्रुप आदींनी देशभक्तीपर विविध नृत्य कलाविष्काराचे सादरीकरणातून ध्वजतिरंग्यास सलामी दिली.

यावेळी पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, सभापती नंदू सुतार, उपसभापती उज्वला देसाई, नायब तहसीलदार दत्तात्रय कोष्टी आदींसह शासकीय पदाधिकारी व कर्मचारी, राजकीय पुढारी, विद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.