उरण 

 रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील पाच वर्षीय हर्षिता या चिमुरडीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत एका दिवसात पाच किल्ले सर केले आहेत. तिच्या या विक्रमाबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोणावळानजीक असलेले पाच किल्ले एका दिवसात सर करण्याचा निश्‍चय तिने पूर्ण केला आहे.  

उरण तालुक्यातील भेंडखळ येथील रहिवासी असलेली हर्षिती कविराज भोईर ही चिमुरडी गेल्या दोन वर्षांपासून आई आणि वडिलांसोबत किल्ले आणि डोंगर सरसर चढून पार करीत आहे. यामध्ये , ती कधीही कसलीही तक्रार करीत नाही. तिला किल्ले आणि डोंगरांच्या पाय वाटेवरून किल्ले सर करायला आवडते हर्षितीची हीच आवड तिच्या वडिलांनी ओळखली आणि आसपास असलेल्या किल्ल्यांवर ट्रेकिंग करायला सुरुवात केली.

गेल्या दोन वर्षांपूर्वी कविराज आपली साडेतीन वर्षीय मुलगी हर्षिती हिला घेऊन किल्ले रायगडावर ट्रेकिंगला गेले होते. यावेळेस , चिमुरडी हर्षिती ही अगदी तुरुतुरु पायर्‍या चढत होती. हर्षितीची ही आवड हेरून कविराज आणि त्याच्या पत्नीने रायगड जिल्ह्यातील इतर किल्ले सर केले. यामध्ये हर्षितीने तिच्या आईडिलांसोबत  कर्नाळा , आशेरी , राजमाची , श्रीवर्धन गड , कलावंतीण ,  तिकोना असे सुमारे 13 गड सर केले आहेत. तर , यामध्ये तुंग हा कठीण मानला जाणारा गड देखील हर्षितीने सर केला असून मागील वर्षीच्या जून महिन्यात ट्रेकर्सची दमछाक करणारा सुमारे 1664 मिटर उंचीचा कळसुबाईचा शिखर देखील अवघ्या साडेतीन तासात यशस्वीपणे सर केला आहे.

 यावेळी, हर्षिती हिने शेवटच्या टप्प्यात असलेल्या 70 ते 80 अंशातील शिडीवर देखील निर्धास्तपणे चढली , पण वडील कविराजच्या मनात थोडीशी भिती निर्माण झाली होती. दरम्यान, गेल्या वर्षभरात हर्षिती हिने दक्षिण घाटातील प्रसिद्ध असलेला पनवेल तालुक्यातील कलावंतीणचा सुमारे 2250 फूट उंचीचा डोंगर देखील अवघ्या दोन तासात पार केला आहे. यावेळी मात्र , डोंगराच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या 15 फुटांच्या उंचीवर दोराने चढताना हर्षितीला मलिफ्टफ करून वर चढवावे लागल्याचे कविराजने सांगितले.

डोंगर उतरताना असलेल्या वरच्या टप्प्यातील पायर्‍या उतरताना हर्षिती काहीशी घाबरली होती. पण , हर्षिती हिच्या या सगळ्या मेहनतीचं फळ म्हणजे अवघ्या साडेतीन( तीन वर्ष आठ महिने) वर्षे वयाची कसळूबाईच्या शिखरावर चढाई करून आपल्या नावाची नोंद ही  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.