अलिबाग 

रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे खाते वाटप आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत पार पडले. अध्यक्षा योगिता पारधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभते अर्थ व बांधकाम सभापतीपद अ‍ॅड निलीमा पाटील यांच्याकडे कृषी व पशूसंवर्धन बबन मनवे तर उपाध्यक्ष्ज्ञ सुधाकर घारेंकडे शिक्षण व आरोग्य सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात सदर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्यासह विवीध विभागांचे अधिकारी, विषय समित्यांचे नवनिर्वाचित सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपस्थित होते.

सुरवातील अभिनंदन आणि दुखवट्याचे ठराव मांडण्यात आले. त्यानंतर निवडून आलेल्या सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले. अ‍ॅड निलीमा पाटील यांच्याकडे अर्थ व बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडे शिक्षण व आरोग्य विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला. बबन मुनवे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन विभागाचा पदभार सोपविण्यात आला. यापूर्वी पार पडलेल्या निवडणूकीनुसार समाज कल्याण विभागाचे सभापतीपदी दिलीप भोईर यांच्याकडे तर महिला व बालकल्याण सभापती पदी गीता जाधव यांची निवड करण्यात आली आहे. खाते वाटप निश्‍चित झाल्यानंतर सभा संपल्याचे अध्यक्षा योगिता पारधी यांनी जाहीर केले.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.