नेरळ

नेरळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नेरळ ग्रामपंचायतच्या यशोमंगल कार्यालयाबाहेर ध्वजारोहण नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांचे हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.नेरळ ग्रामपंचायतच्या हुतात्मा चौकात नेरळ ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच शंकर घोडविंदे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी मोठ्या प्रमाणात देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.सुरुवातीला हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला सरपंच रावजी शिंगवा यांचे हस्ते तर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्याला उपसरपंच शंकर घोडविंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले.त्यानंतर हुतात्मा चौक मधील ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.