कर्जत 

कर्जत तालुक्यात 70 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने शालेय विध्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी मनोरंजनाचा लाभ घेतला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तालुक्यातील प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे विशेष म्हणजे बहुतांश ठिकाणी ध्वजारोहणा पूर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

पंचायत समिती मध्ये सभापती सुजाता मनवे यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी माजी सभापती प्रदीप ठाकरे, गट विकास अधिकारी बालाजी धुरी, विस्तार अधिकारी सुनील आहिरे यांच्या सह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. नगरपरिषद कार्यालायातील ध्वजारोहण सोहळा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी  माजी आमदार सुरेश लाड,  मुख्याधिकारी रामदास कोकरे आदींसह नगरसेवक व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत न्यायालयात न्यायाधीश मनोद तोकले, माथेरान नगरपालिकेच्या आवारात नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष झुलकरनैन डाभिया, कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, कर्जत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, जिल्हा परिषद शाळा दहिवली आणि जनता विद्या मंदिर दहिवली येथे माजी आमदार सुरेश लाड, स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रेय डोंबे विद्यानिकेतन मध्ये शालेय समिती सदस्य डॉ. नितीन आरेकर, वरई ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुरेश फराट, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात अध्यक्ष परशुराम घारे, यांनी ध्वजारोहण केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विलास देशमुख, सहकारी भात गिरणीत सीताराम मंडावळे यांनी धवजारोहण केले.

पोलीस मैदानात झालेल्या सार्वजनिक ध्वजारोहण सोहळ्याला असंख्य कर्जतकर उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  त्यानंतर पोलिसांनी संचलन सादर केले. अभिनव ज्ञान मंदिरच्या स्काऊट व गाईडच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीनी संचलन व विविध प्रात्याक्षिके सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. शहरातील विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याने उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

पळसदरी येथील शाळेत शालेय समितीने  दहावी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या हस्ते 15 ऑगष्ट रोजी आणि बारावी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थी किंवा विद्यर्थिनीच्या हस्ते 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यंदाचे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण करण्याचा पहिला मान 12 वी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या कु. सृष्टी अजित निगुडकर हिने मिळविला. तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक ग्रामस्थ व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.