मुंबई

बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्‍चन असोसिएशन (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित केलेल्या प्रतिष्ठेच्या सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन कॅरम स्पर्धा 2020 मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने दि. 10 ते 15 फेब्रुवारी या कलावधीत वाय.एम.सी.ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे खेळविण्यात येणारी आहे. ही स्पर्धा वाय.एम.सी.ए.चे कार्याध्यक्ष शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सबॅस्टीयन, सरचिटणीस पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय.एम.सी.ए.चे चिटणीस भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.

मुबंई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने सलग सात वर्षे आयोजित करण्यात येणार्‍या या जिल्हा गुणांकन स्पर्धेत पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात ही स्पर्धा खेळविण्यात येईल. सदर स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) व आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या नवीन नियमावलीनुसार खेळविली जाईल.

या प्रतिष्ठेच्या जिल्हा स्पर्धेमध्ये एकूण रुपये 1,25,000/- ची रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्र विजेत्या स्पर्धेकांना प्रदान करण्यात येतील. पुरुष एकेरी विजेत्याला 20,000 रुपये रोख, महिला एकेरी विजेतीला 7,500/- रुपये रोख व उपउपांत्य फेरीपर्यंत रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

इच्छुक स्पर्धकांनी यतीन ठाकूर, मानद कार्यवाह, मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्यालय, जी-बी-4, बाल गोविंददास सोसायटी, स्टार सिटी सिनेमा रोड, शिवाजी पार्क, माहीम, मोबाईल 80804 33544 येथे संपर्क साधावा.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.