दिनांक 25 जानेवारी 2020 

इतर दिनविशेष :

1627 - आधुनिक रसायशास्त्राचे जनक रॉबर्ट बॉईल यांचा जन्म.

1736 - ख्यातनाम फ्रेन्च गणिती जोसेफ लई लँगेज यांचा जन्म.

1840 -ग्रँट मेडिकल कॉलेजात अध्यापकपद

1847 - विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

1848 - स्वीडीश संशोधक अन्सर्ट फ्रेडरिक अलेक्झांडरसन यांचा जन्म.

1915 - न्यूयॉर्क टेलिफोन एक्सचेजच्या इमारतीतून टेलिफोनचा जनक अलेक्झाईन्डर ग्रॅहम बेल याने आपल्या मित्राशी टेलिफोनवर पहिले संभाषण केले.

आज मोबाईलमुळे फोनचंहो आकर्षण कमी होत चालेले आहे. परंतु, आजपासून 70-80 वर्षांपूर्वी ज्याने टेलिफोन नावाचे महान यंत्र निर्माण करून ज्या दिवशी पहिले संभाषण स्वत: त्या फोनवर केले, तो ‘25 जानेवारी’ हा ऐतिहासिक दिवस! हा दिवस यंत्राच्या इतिहासातील सुवर्णदिन म्हणून ओळखला जातो.

दि. 25 जानेवारी 1115. स्थळ : न्यूयॉर्क टेलिफोन एक्स्चेंज इमारतीचा 15 वा मजला. बेल एका मोठ्या टेबलखुर्चीवर आरामात बसले होते. आजचा दिवस त्यांच्या कसोटीचा दिवस होता. अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनीचे डायरेक्टर, महापालिकेचे अधिकारी, श्रीमंत उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक यांचा गराडाच त्यांच्याभोवती होता. अमेरिकेचे लक्ष बेल यांनी बनविलेल्या एका विचित्र यंत्राकडे होते. त्याचे कारणही तसेच होते. या छोट्याशा यंत्राच्या अंतरापासून दूरवर असलेल्या सॅनफ्रान्सिस्को या शहरातील एका इमारतीत बेलचा मित्र वॅटसन त्याच्या फोनची आतुरतेने वाट पाहात होता. न्यूयार्क ते सॅनफ्रान्सिस्को हे अंतर तब्बल 4115 कि.मी. होते. संभाषण इतरांना ऐकू यावे यासाठी अंदाजे एक लाख 30 हजार टेलिफोन खांब उभारण्यात आले होते. त्यासाठी वापरलेल्या तारेचे वजन अंदाजे 3000 टन होते. आणि तो ऐेतिहासिक दिवस उजाडला. अमेरिकन वेळेनुसार बरोबर 4 वा. 30 मिनिटांनी अलेक्झांडर बेलनी आपल्या टेलिफोनचा रिसिव्हर उचलला आणि एक लहानसे वाक्य उच्चारले, ‘वॅट्सन, तू तेथे आहेस ना?’ वॅटसनने आपल्यासमोरील रिसिव्हर कानाशी घट्ट पकडून उत्तर दिले, ‘तुझा प्रश्‍न मला अगदी सपष्टपणे ऐकू आला.’ त्यानंतर बेल आणि वॅटसन यांनी एकोणचाळीस वर्षांपूर्वीच्या टेलिफोन संशोधनाच्या काळात जे संभाषण केले होते, त्या संभाषणाची पुनरावृत्ती केली. शेकडो लोकांनी या अद्भुत संभाषणाचा आस्वाद घेतला किंबहुना त्या काळात तो एक चमत्कारच होता. 1915 सालीच मार्च महिन्यापर्यंत व्यापारी तत्त्वावरील टेलिफोन सेवेचा अमेरिकेत प्रारंभ झाला. ज्याने या टेलिफोनचा शोथ लावला त्याचे नाव अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

3 मार्च, 1847 रोजी अलेक्झांडरचा जन्म स्कॉटलंडमधील एडिंबर्न या शहरात झाला. ‘एका ठिकाणी बोललेले संभाषण शेकडो मैल दूर असलेल्या व्यक्तीला ऐेकू येईल असे एखादे यंत्र बनवले तर? हा प्रश्‍न त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. त्यासाठी आवाजाच्या लहरी कशा उत्पन्न करता येतील, हा प्रश्‍न त्याला सतावीत होता. या काळात तारयंत्राचा शोध लागला होता.

विद्युततारांतून जर संदेश पाठवता येतो, तर अशाच तारेमार्फत प्रत्यक्ष शब्द पाठवले तर? यासाठी बेलने कानाच्या रचनेचा व शरीरशास्त्राचासुद्धा  अम्यास केला होता. आपला सहकारी वॅटसन याच्याबरोबर प्रयोगशाळेत दूरध्वनीबाबत प्रयोग करताना एका धातूच्या पातळ पट्टीला कंपने द्यायची होती. ही पट्टी एका-एका चौकटीत घट्ट बसवली होती, तेव्हा ती ओढताना जोराचा आवाज होऊन बेल ज्या पलीकडच्या खोलीत काम करत होता, त्याला स्पष्टपणे जाणवला आणि अलेक्झांडराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण, टेलिफोनच्या शोधाच्या तो अअगदी जवळ अआला होता. यानंतर सतत 40 आठडे यावर प्रयोग करून त्यांच्या प्रयतणांना यश आले. ’मि. वॅटसन, इकडे या पाहु हेच ते 1876 साली प्रयोगाच्या वेळी काढलेले वाक्य 25 जानेवारी, 1915 रोजी त्यांनी उच्चारले. त्या वेळी वॅट म्हणाले, ‘बेल, 1875 ची गोष्ट वेगळी होती.

       त्या वेळेस प्रयोग करताना तुम्ही व मी वेगवेगळ्या खोलीत होतो आणि म्हणून वीस-पंचवीस पावले चालून मी तुमच्याकडे आलो. पण आज मला तुमच्याकडे यायला निदान एक आठवडा लागेल. कारण आता आपल्या दोघांतील अंतर आहे 3390 मैल.’, अलेक्झांडरला पुढे महान शास्त्रज्ञ म्हणून गौरवण्यात आले; परंतू शेवटी शेवटी मात्र त्यांना स्वत:ला सारखे फोन येत असल्यामुले त्या टेलिफोनचा राग येऊ लागला व अखेर टेलिफोन सतत चालू राहतोच असे नाही. तो कधी तरी डेड होतोच. त्याचप्रमाणे र ऑगस्ट, 19रर रोजी हा मानवी टेलिफोन कायमचाच डेड झाला.

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.