गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्डकप स्पर्धेत भारताला उपान्त्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने वर्ल्डकप जिंकण्याच्या आशांना सुरुंग लागला.  परंतु या पराभवातून विराट कोहलीची  इंडिया पूर्णपणे सावरली असून गेल्या काही महिन्यात मायदेशात झालेल्या सर्व मालिका जिंकून आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.  न्यूझीलंड दौर्‍यापूर्वी भारताने मायदेशात पाच वेळा वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली होती.  न्यूझीलंड दौर्‍यापूर्वी मालिका विजय मिळाल्याने भारतीय टीम पूर्ण जोशात मैदानात उतरेल.  त्यामुळे न्यूझीलंडची टीम भारताला कशी झुंज  याकडेच सार्‍या क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.  न्यूझीलंडमध्ये भारताला वर्ल्डकप मध्ये झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड करण्याची सुरेख संधी चालून आली आहे.  आजपासून पाच टी-20 च्या मालिकेला सुरुवात होणार आहे.  टी-20 मध्ये भारताची टीम तगडी असली तरीसुध्दा सलामीवीर डावखुरा फलंदाज शिखर धवनला ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या मालिकेत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड  मालिकेला मुकावे लाागणार आहे.  तरीसुध्दा भारतीय टीमचे पारडे जड असेल यात शंकाच नाही.  न्यूझीलंडला त्याच्याच देशात आणि त्यांच्याच प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी मिळणार असल्याने भारतावर थोडासा दबाव असणे स्वाभाविकच असेल यात शंकाच नाही.  न्यूझीलंडच्या विकेट फलंदाजांसाठी उपयुक्त असतात.  पण त्यांची मैदाने खुपच छोटी आहेत.  काही मैदानाच्या सीमारेषा 60 ते 65  तर काहींच्या सीमारेषा 70 ते 80 यार्डाच्या आहेत.  त्यामुळे कर्णधारासमोर फिरकी गोलंदाजांना कोठल्या दिशेने गोलंदाजी घ्यायची असा पेच निर्माण होतो.  वर्ल्डकप नंतर दोन्ही टीम प्रथमच एकमेकांसमोर उभे येणार असल्याने साहजिकच प्रत्येक लढत ही चुरशीची, निकराची होईल यात वादच नाही.  टी-20 ची मालिका पाच सामन्यांची असल्याने भारतीय टीमला आपल्या संघातील  खेळाडूंना संधी देता येईल.  न्यूझीलंडच्या टीमची खरी मदार असेल ती कर्णधार केन विलियमसन अनुभवी फलंदाज रॉस टेलर, कॉलीन मन्रो, लॅथम, ग्रँडहोम यांच्यावर विलियमसन हा विराट कोहली, आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ यांच्या पंक्तीतील जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे यात वादच नाही.  विलियमसनची फलंदाजी स्फोटक नसली तरी त्याच्या फलंदाजीत नजाकत कलात्मकचे एक  किनार आहे.  त्यामुळे मॅच विनर ठरु शकतो.  रॉस टेलर हा सर्वात अनुभवी फलंदाज आहे.  गोलंदाजांना नामोहरम करण्याची ताकद टेलरच्या बॅटमध्ये आहे.  टेलर एक हाती फलंदाजी करुन आपल्या टीमला सहज विजयी करु शकतो.  मुन्रो, लॅथम, ग्रँडहोम हे सुध्दा युवा दमदार फलंदाज आहेत.  न्यूझीलंड टीमला उणीव भासले ती सर्वात अनुभवी सलामीवीर  गुटट्ीलची!  याच मार्टिनने इंग्लंडमध्ये झालेल्या वल्डेकपच्या उपान्त्य फेरीत अचूक थ्रो करुन महेंदसिंह धोनीला धवचित करुन भारताच्या विजयाचा मार्ग बंद केला होता.  फलंदाजीप्रमाणे त्याच्याकडे ट्रेट बोल्ट आणि टीम साऊदी अशी जलदगती गोलंदाजीची अनुभवी जोडगोळी आहे.  बोल्ट गेले काही वर्ष आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स मधून खेळत असल्याने त्याला भारतीय टीम मधील फलंदाजांचे  दुवे माहित आहेत.  साऊदीकडे चेंडू दोन्ही बाजूनी स्विंग करण्याची क्षमता आहे.  भारतीय फलंदाजांची खरी कसोटी लागेल ती फर्ग्युसनचा तेज, उसळता मारा खेळताना!  त्याचा वेग 145 पेक्षा जास्त असतो.  त्यातच न्यूझीलंडमधील विक्रट त्याच्यासारख्या वेगवान गोलंदाजांच्या नेहमीच प्रेमात पडतात.  त्यांच्याकडे सॅटनर, ईश सोंधीसारखे फिरकी गोलंदाजसुध्दा आहेत.

भारताला सलामीजोडीचा प्रश्‍नच येत नाही.   राहूल ही सलामीची जोडी पूर्णपणे फॉर्ममध्ये आहे.  कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस नेहमीच पडत असतो.  मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे या युवा फलंदाजावर मोठी भिस्त असेल.  अखेरच्या हाणामारीच्या षटकात धावांची गती वाढविण्यासाठी जबाबदारी यांच्यावर असेल.  रविंद्र जाडेजा हा खेळाडू टीमसाठी सर्वात महत्वाचा खेळाडू असेल.  फलंदाजी, गोलंदाजी  क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाडयांवर याचा हात कोणीही धरु शकणार नाही.  शमी बुमराह, सैनी हे जलदगती गोलंदाजांचे त्रिकुट भारतासाठी नेहमीच चमकदार कामगिरी करत आले आहे.  चहल, कुलदिप, वॉश्गिंटन, सुंदर यांची फिरकी सुध्दा प्रभावी ठरेल.  त्यामुळे न्यूझीलंड विरुध्दची टी-20 मालिका निश्‍चितपणे रंगतदार होणा यात शंकाच नाही.  म्हणूनच विराट सेनेला मालिका विजयासाठी 

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.