अलिबाग

पेण-खोपोली रस्त्याच्या सुरु असलेल्या कामामुळे सातत्याने भारत संचार निगमची केबल तुटली जात असल्याने इंटरनेटसह सर्वच सेवा ठप्प होण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे बँकेचे व्यवहारही ठप्प होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन आठवडयापासून सातत्याने बीएसएनएलची सेवा ठप्प होण्याचा प्रकार घडताना दिसत आहे. पेण-खोपोली महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळे ओएफसी ही मुख्य केबल सारखी तुटत असल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे भारत संचार निगमच्या अधिकार्‍यांनी सांगितले. टेलिफोन सेवा, इंटरनेट सुविधा, बीटीएस, एक्सेंज, ब्रॉडबँन्ड, लिज लाईन या सर्वच सेवांमध्ये सातत्याने व्यत्यय येत आहे. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना होत आहे. पैशांची देवाण-घेवाण, ऑनलाईन शॉपिंग, शासकीय अर्ज भरणे, निवडणुकीचे अर्ज भरणे, अशी बहुतांश कामे होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बँकेचे व्यवहारही सातत्याने ठप्प होत असल्याने सामान्याबरोबर व्यापारीवर्ग देखील हैराण झाला आहे.

ठिकठिकाणच्या रस्ते रुंदीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी ऑप्टीकल फायबर केबल नादुरुस्त झाली असल्याने इंटरनेट सेवा धिम्मी झालेली आहे  जुनी केबल महामार्गाच्या माती भरावामध्ये गाढली गेली असल्याने बीएसएनएलला झालेला बिघाड शोधण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. रुंदीकरण कामामध्ये बीएसएनएलची वेस्टर्न, टॅलीकॉम रिजन (डब्ल्युटीआर) ही टिम सतत सोबत राहून तुटलेली केबल युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे प्रयत्न करीत असल्याची माहिती कनिष्ठ दुरसंचार अधिकारी सुनील पाटील यांनी दिली. मात्र अनेकदा बिघाड सापडत नसल्याने सेवा पुर्ववत होण्यासाठी वेळ लागत असल्याची माहीती मिळाली.

रायगड जिल्ह्यात महाड आणि पाताळगंगा परिसरात बीएसएनएलची इंटरनेट सुविधा खंडीत होण्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यांची दुरुस्ती, वीजभारनियमन यामुळे कनेक्टीव्हीटी विस्कळीत होते.

महामार्ग रुंदीकरणाचा परिणाम

महामार्ग रुंदीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी ऑप्टीकल फायबर केबल नादुरुस्त झाली असल्याने इंटरनेट सेवा धिम्मी झालेली आहे  जुनी केबल महामार्गाच्या माती भरावामध्ये गाढली गेली असल्याने बीएसएनएलला झालेला बिघाड शोधण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. 

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग