अलिबाग 

रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर नारायण पाटील अर्थात भाऊ यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पीएनपी सहकारी सांस्कृतीक कला विकास मंडळाच्यावतीने गुरुवार दि. 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता  पीएनपी नाटयगृहात रायगडकरांना कलर्स मराठी वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा या सुरमयी कार्यक्रमातील श्रावणी वागळे, अमोल घोडके, स्वराली जोशी, अक्षया अय्यर, राजू नदाफ आणि रविंद्र खोमणे हे स्वर षडज् सुरांची मेजवानी देणार आहेत. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीनेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. प्रभाकर पाटील म्हणजे रायगडचे भाग्यविधाते म्हणून राज्यात ओळखले जाणारे स्व. भाऊ राजकारणासोबतच कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, संगीत, सामाजिक अशा सर्वच क्षेत्राचे आश्रयदाते म्हणून सर्वपरिचित होते. स्व. प्रभाकर पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता  पीएनपी नाटयगृहात पीएनपी सहकारी सांस्कृतीक कला विकास मंडळाच्यावतीने रायगडकरांना स्वरमैफिलीला अनुभव देऊन स्व. भाऊंना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली जाणार आहे. या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहून आस्वाद घेण्याचे आवाहन पीएनपी सहकारी सांस्कृतीक कला विकास मंडळाच्यावतीने अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.