पंढरपूर 

 गोपाळपुरातील मातोश्री वृद्धाश्रमासाठी उर्जा देणारे ठरावे असे कार्य स्वेरीतील विद्यार्थ्यांकडून  घडले. स्वेरीतून सर्व विद्यार्थी ‘श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृध्दाश्रमा’कडे निघाले. तेथे पोहोचल्यानंतर वृध्दाश्रमात असलेल्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला.

स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक उपक्रमाबरोबरच अनेक विधायक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मकर संक्रांतीचे औचित्य साधून स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरींग स्टुडंट्स असोसिएशन (मेसा) च्या विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. सुरवातीला ‘मेसा’चे समन्वयक प्रा.संजय मोरे यांनी ‘मातोश्री  वृद्धाश्रमा’मध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. प्रसिद्ध भारुडकार सौ. चंदाताई तिवाडी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. सौ. तिवाडी यांनी विद्यार्थ्यांना भारुडाच्या माध्यमातून बहुमोल मार्गदर्शन करताना आई-वडिल, नाते व गुरुजन यांचे जीवनात असणारे अनन्य साधारण महत्व समजावून सांगून विद्यार्थ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांचे वर्णन ऐकविले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने दिलेल्या रकमेतून वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ दिले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते मांडली. व्यवस्थापक धनंजय राक्षे यांनी वृध्दाश्रमाची वाटचाल सांगितली तर वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक श्रीकांत देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानसी भूमकर, प्रणोती भोसले, चंद्रप्रभा अस्तुरे, मुस्कान आत्तार, विकास धुमाळ, रोहित आदलिंगे, अरबाज तांबोळी, ऋषिकेश दंडवते, ऋतुराज जाधव, मयूर पावसे, प्रज्वल खडके यांच्यासह ५० विद्यार्थ्यांचे योगदान लाभले. या उपक्रमात संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने कार्यक्रम समन्वयक प्रा. संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रा. अभिजित शिंदे यांच्यासह इतर प्राध्यापक  उपस्थित होते. सिद्धेश्वर खपाले व पोर्णिमा निकते या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले व मेसाच्या विद्यार्थिनी अध्यक्षा शुभदा म्हेत्रे यांनी आभार मानले.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.