चिपळूण

मंडणगड तालुक्यात सन 2018 ते 19 मध्ये रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून मंडणगड सार्वजनिक बांधकामाचे प्रमुख अभियंता अजित कदम यांनी पार्टनरशीपमध्ये काम करून ह्या रेणुका कंपनीला नियमबाह्य पैसे दिल्याचा आरोप शेकापचे रत्नागिरी जिल्हा संघटक शब्बीर अलवी यांनी केला आहे. तसेच मंडणगड सब डिव्हिजन ही भ्रष्टाचाराची साखळी निर्माण करण्याचे ठिकाण बनले असून याची लाचलुचपत विभागामार्फत कारवाईची मागणी शब्बीर अलवी यांनी यावेळी केली आहे.

कदम हे काही निवडक ठेकेदाराला हाताशी धरून अशाप्रकारचा मनमानी कारभार करत असल्याचा आरोप देखील अलवी यांनी यावेळी केला. तसेच मंडणगड तालुक्यात एएमसीच्या कामात देखील प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच अजित कदम यांनी काही ठिकाणी कामे न होताच  त्याची बिले पाठवत आहेत. याबाबत आपण शेकापचे नेते आ.बाळाराम पाटील यांच्यासमवेत बांधकाममंत्री यांची भेट घेणार असून हा सर्व प्रकार उघडकीस आणणार आहे.

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग