दापोली

कादिवली दापोली या रस्त्यावरील बोंडीवली थोरलाकोंड एस.टी.स्टॉपजवळ तीव्र उतारावर एका रोडरोलरचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत वाळू राठोड वय 41 वर्षे, रा.कुंबळे, ता.मंडणगड (मूळ रा.बिजापूर, कर्नाटक) हा रोडरोलर चालवण्याचे काम गेले अनेक वर्षे करीत आहे. मंगळवार, दि. 21 जानेवारी रोजी सकाळी तो नेहमीप्रमाणे बाहेर पडला. सकाळी मंडणगडवरुन पालवणी मार्गे दापोलीकडे येण्यासाठी निघालेला हा रोडरोलर दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास बोंडीवली येथील थोरलाकोंड एस.टी.स्टॉपजवळील एका तीव्र उतारावरुन जात असताना चालक चंद्रकांत राठोड याचा रोडरोलरवरचा ताबा सुटला व राठोड हे खाली पडले. याचवेळी त्याच्या अंगावरुन पाठीमागील चाक गेले त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

 या अपघाताची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा तपास दापोली पोलीस करीत आहेत.

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग