खेड 

हिंदू जनजागृती समितीकडून घेतली जाणारी हिंदू राष्ट्र-जागृती सभा ही केवळ सभा नाही. या माध्यमातून हिंदूंना संघटित करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राविषयी सातत्याने  सांगितले जात आहे. हासुद्धा एक प्रकारच्या स्वातंत्र्यसमराचाच भाग आहे. आपल्या पिढीने हिंदू राष्ट्रासाठी त्याग केला, तरच पुढील पिढीपर्यंत हिंदू राष्ट्राचा विचार जाईल. त्यामुळे आता केवळ एकच लक्ष, हिंदू राष्ट्र! असे उद्गार सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी काढले.

19 जानेवारी या दिवशी येथील एस.टी. आगाराच्या गोळीबार मैदानात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला त्या संबोधित करत होत्या. या वेळी व्यासपीठावर हिंदू जनजागृती समितीचे गुजरात, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक मनोज खाड्ये आणि हिंदू जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या सौ.अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या. या सभेला 3500 धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेचा प्रारंभ सनातनचे साधक  ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद करून केला. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु स्वाती खाड्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हिंदू जनजागृती समितीचे मनोज खाड्ये यांनी हार घातला. त्यानंतर वेदमंत्रपठण करण्यात आले. वेदमूर्ती सर्वश्री प्रवीण वैद्य, विनायक जोशी आणि योगेश जोशी यांचा सत्कार हिंदू जनजागृती समितीचे शशिकांत खेडेकर यांनी केला. या सभेत हिंदू जनजागृती समितीचे ओंकार जरळी आणि त्यांचे सहकारी यांनी स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर केली.

या सभेला सर्वश्री  शिवसेना माजी नगरसेवक राजेश बुटाला, धर्मप्रेमी अनिकेत कानडे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रशांत खातू, करंजाणी दापोली येथील नंदकुमार सालेकर महाराज, मुंबके येथील रघुनाथ सालेकर, भाजप शहराध्यक्ष भूषण काणे, मनसेचे विनय माळी, पं.स.माजी उपसभापती रवींद्र मोरे, खोपी गावचे सरपंच राजेंद्र भोसले, 11 गाव कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष महादेव मिसाळ, शेरवली गावचे विजय राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.