नवी दिल्ली 

भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पाच टी 20 सामने खेळणार आहे. टी 20 मालिका झाल्यावर 5 ते 11 फ्रेब्रुवारी दरम्यान तिन एकदिवसीय मालिका होणार आहे. तर दौर्‍याच्या अखेरीस 21 फेब्रुवारी ते 4 मार्च या दरम्यान दोन कसोटी सामने खेळणार आहेत. या दौर्‍यातील टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून त्यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघाचा 2020 मधील पहिला परदेश दौरा हा न्यूझीलंडचा आहे. त्यासाठी जाहीर केलेल्या संघात शिखर धवनचा समावेश करण्यात आला होता. पण शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने दौर्‍यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी टी 20 संघात खेळण्यासाठी संजू सॅमसनला बीसीसीआयने हिरवा कंदील दाखवला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी रात्री उशीरा घोषणा करण्यात आली होती. संघात अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माने भारतीय संघात पुनरागमन केले होते, पण युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला मात्र संघात स्थान मिळालेले नव्हते.

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग