बोर्ली मांडला 

मुरूड तालुक्यतील नवतरुण मित्र मंडळ व आगरी समाज मजगाव आयोजित पंचक्रोशी मर्यादित कबड्डी स्पर्धेत श्री गणेश संघ,आदाड,अंतिम विजेता तर श्री भैरवनाथ संघ,मजगाव उपविजेता ठरला आहे. मुरूड तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ व आगरी समाज मजगाव आयोजित पंचक्रोशी मर्यादित कबड्डी स्पर्धेत 48 संघांनी सहभागी झाले होते.ही स्पर्धा विठ्ठल मंदिर परिसरात दोन दिवसरात्र सुरू होती.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री गणेश संघ,आदाड, द्वितीय क्रमांक श्री भैरवनाथ संघ,मजगाव,तृतीय क्रमांक शिवलिंग संघ,वाळवटी, तर चतुर्थ क्रमांक शिवाई संघ,नांदगावने पटकावले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मिथुन भोईर, मजगाव ,उत्कृष्ट गणवेश वाघदेवी संघ,मनेर, उत्कृष्ट खेळाडू म्हणून पराग पाटील,मजगावं, तर उत्कृष्ट पक्कड ओंकार गाणार,मजगाव ठरले आहे.

सदर स्पर्धेचे संतोष गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली अशोक गिरणेकर यांनी उद्घाटन केले. विजेत्या संघास आणि उत्कृष्ट खेळाडूंस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषक,आणि रक्कम प्रदान करण्यात आले.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.