धाटाव 

सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान आयोजित तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत वरिष्ठ गटात पोफळघर संघाने एक डाव पाच गुणांनी अवचितगड मेढा संघाला पराभूत करीत विजेतेपद मिळवले. सामना आपल्या पदरात पाडून घेतल्या नंतर पोफलघर संघाच्या खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला. या स्पर्धेच्या छोट्या गटात सानेगुरुजी विद्यानिकेतन (अ) प्रथम, सानेगुरुजी विद्यानिकेतन(ब) द्वितीय, को.ए.सो मेहेंदळे हायस्कूल(रोहा) तृतीय तर चतुर्थ क्रमांक कुणबी समाज म्हसाडी रोहा याने पटकाविला आहे. तर एकीकडे उत्कृष्ट संरक्षण म्हणून साहिल भळे (सानेगाव ब), आक्रमक खेळाडू म्हणून विघ्नेश शेळके (सानेगाव अ), सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यश चौगले (सानेगाव अ) यांचा सन्मान करण्यात आला.

खो खो स्पर्धेच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक जे.बी स्पोर्ट्स क्लब, पोफळघर, द्वितीय क्रमांक अवचितगड मेढा (अ), तृतीय क्रमांक ओम साई नवतरुण मंडळ सानेगाव, चतुर्थ क्रमांक अवचितगड मेढा (ब) या संघाने मिळविला आहे. मोठ्या गटात उत्कृष्ट संरक्षण म्हणून अक्षय मोरे (अवचितगड मेढा), आक्रमक खेळाडू  म्हणून साहिल जाधव (पोफळघर ), उत्कृष्ट खेळाडू म्हणून विक्रांत शिंदे (पोफळघर) यांचा सन्मान  करण्यात आला.

आमदार अनिकेत तटकरे, वरसे सरपंच रामा म्हात्रे, विनोद पाशीलकर, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज, माधुरी सणस, युनिकेम लॅबरोटेरीज यांनी स्पर्धा आयोजित करण्यासाठी विशेष सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष रोशन चाफेकर व त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, नगरसेविका सौ.स्नेहा आंबरे, रोहा शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे, पत्रकार राजेंद्र जाधव, महेंद्र मोरे, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र चाळके, नेहरू युवा केंद्र रोहा तालुका स्वंयसेवक ममता शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तर बक्षीस वितरण रोहा अष्टमी नगरपरिषद मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, रोहा सिटीझन फोरम अध्यक्ष आप्पा देशमुख, निमंत्रक नितीन परब, पत्रकार मिलिंद अष्टीवकर, भाजपाचे संजय कोनकर, राष्ट्रवादी काँग्रेस  श्रीवर्धन मतदारसंघ उपाध्यक्ष सचिन चाळके, राष्ट्रवादी  काँग्रेस शहर उपाध्यक्ष चंद्रकांत पार्टे, पत्रकार अल्ताफ चोरडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

अवचितगड मेढा संघाला द्वितीय क्रमांक

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग