मुंबई

बॅडमिटंनच्या शटलकॉकसाठी वापरण्यात येणा-या पक्षांच्या पिसा ऐवजी कृत्रिम पिसापासून तयार करण्यात आलेल्या शटलकॉकला विश्‍वबॅडमिनटंन संघटनेने अखेर मान्यता दिली आहे. 2021 पासून विश्‍व बॅडमिटन संघटनेच्या जगातील सर्व स्तरांवरील स्पर्धमध्ये कृत्रिम पिसांच्या शटलकॉकचा (फुलांचा) वापर अनिवार्य करण्यात आला आहे. निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने हा निणर्य घेण्यात आला असला तरीही, त्यामुळे बॅडमिंटन खेळाचे यापुढील संवर्धन आणि सशक्तीकरण किती होईल याबाबत विश्‍वस्तरावरील अग्रगण्य खेळाडूमध्ये साशक्ता आहे.

सध्या योनेक्स कंपनीच्या मदतीने या कृत्रिम शटलकॉकचे उत्पादन विश्‍व संघटनेने केले असून त्याची चाचपणीही करण्यात आली आहे. विश्‍व संघटनेच्या तीन स्पर्धामध्ये त्यांचा वापर करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धा दरम्यान संघर्षाची पातळी किंचितही कमी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे.कृत्रिम शटलकॉकमुळे वापरण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढली आहे. नैसर्गिक पिसांपासून तयार करण्यात आलेले शटलकॉक महागडे असून खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. पिसांसाठी पक्षांच्या प्रजातीवर गेली कित्येक वर्ष होणारा अन्यायही टाळण्यासाठी हा निर्णय अखेर घेतला गेला.

सध्या योनेक्स या कंपनी सोबत संघटनेने करार केला असून या कृत्रिम शटलकॉकच्या निर्मितीसाठीचे नियम निकष निश्‍चित करुन अन्य उत्पादकांना परवानगी देण्यात येणार आहे. विश्‍व बॅटमिटंन संघटनेचे सचिव थॉमस लुंड यांनी हा निर्णय म्हणजे संघटनेने उचलेले सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाबाबत मत व्यक्त करताना भारताचे माजी बॅडमिटंन खेळाडू व राष्ट्रीय संघटनेचे उपध्याक्ष प्रदिप गंर्ध म्हणाले पिसांसाठी होणारी पक्षांची छळवणूक थांबेल.  

 

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.