मुंबई 

अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ङ्गतान्हाजी : द अनसंग वॉरिअरफया चित्रपटातील काही प्रसंगाला मॉर्फिंग करत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहर्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहर्‍यावर अमित शाह यांचा चेहरा लावण्यात आल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजी राजे यांनी तीव्र शब्दात नि।ेध नोंदवत संबधीत पक्षाने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.

ङ्गतान्हाजी : द अनसंग वॉरिअरफ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर गर्दी खेचत असताना दिल्ली विधानसभेचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान चित्रपटातील दृष्यांना मार्फींग करत रत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहर्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहर्‍यावर अमित शाह यांचा चेहरा लावण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीची भावना उफाळून आली आहे.

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हा प्रकार अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय आहे. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. या प्रकरणावर ट्विट करून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये, असं आवाहनही त्यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.

पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा मॉर्फ केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या प्रकारावर ट्विटवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सायबर सेलला टॅग करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्विटरवर करण्यात येत आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.