अलिबाग

राष्ट्रीय युवा दिन व पंधरवड्यानिमित्त पी.एन.पी. कॉलेज वेश्‍वी येथे एचआयव्ही/एड्स  विषयावरील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर वादविवाद स्पर्धेचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, पीएनपी कॉलेज प्राचार्य  संजीवनी नाईक व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने  यांच्या उपस्थित झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी एचआयव्ही प्रतिबंधात्मक शपथ घेण्यात आली.  

र्यक्रमामध्ये श्री. संजय माने यांनी युवक युवतींमध्ये एचआयव्ही/ एड्स विषयी जनजागृती व्हावी याकरिता त्यांना रेड रिबन क्लब च्या माध्यमातून गावपातळीवर एचआयव्ही समुपदेशन व तपासणी  करण्यात यावी   असे सांगितले. एचआयव्ही  संसर्गित असणार्‍या व्यक्तींना लवकरात लवकर एआरटी उपचाराकरिता एआरटी केंद्रामध्ये संदर्भित करावे असे सांगितले. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीशी कोणताही भेदभाव न करता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून चांगली वागणूक द्यावी असे सूचित केले.

डॉ. अजित गवळी यांनी युवा पिढीकरिता संतुलित आहार, व्यायाम, योग यांचे महत्व सांगून दररोज सकाळी 3 ते 4 किलोमीटर चालणे गरजेचे असून शरीर तंदुरुस्त राहणेकरिता वारीत बाबींची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगितले.

पीएनपी कॉलेज प्राचार्य   संजीवनी नाईक यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याबद्दल या विभागाचे विशेष आभार मानले.  त्यामुळे पीएनपी कॉलेजमधील युवक युवतींच्या ज्ञानामध्ये भर पडत असल्याचे सांगितले.  तसेच कॉलेजमधील युवक युवतींना पॅथॉलॉजि, रक्तपेढी, पाणीनमुना तपासणी केंद्र या  विभागा मध्ये अँप्रेन्टीसशिप देऊन सहकार्य करावे. जेणेकरून विध्यार्थाना विविध तपासण्याविषयी माहिती तसेच प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळेल व त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडून त्यांना नोकरी  मिळणेस उपयोग होईल. यावर  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी   यांनी प्रयोगशाळा, रक्तपेढी, पाणी तपासणी, क्षकिरण, ईसीजी, डायलेसीस विभागामध्ये विध्यार्थ्यांना माहिती व प्रत्यक्ष काम  करण्याची संधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

वादविवाद स्पर्धा

पीएनपी कॉलेज वेश्‍वीमधील वादविवाद स्पर्धा  तीन ग्रुपमध्ये  घेण्यात आली, गट क्र. 1 ला एचआयव्ही  विषाणू - संसर्ग, गट  क्र. 2 ला एचआयव्ही वर्तणूक व प्रतिबंध (योग्य आचरण ), तर गट क्र. 3 याना एचआयव्ही तपासणीचे इ एआरटी  उपचाराचे महत्व  असे विषय देण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक हा   गट क्र. 1 कु.   मिताली विश्‍वास नाईक व सहकारी यांचा आला असून त्यास प्रथम पारितोषिक रु. 500/-, व्दितीय क्रमांक हा   गट क्र. 2 कु.  भूषण रामदास कार्लेकर व सहकारी  यांचा आला असून त्यास व्दितीय पारितोषिक रु. 300/- व तृतीय क्रमांक हा   गट क्र. 3 कु. भाग्यश्री पाटील व सहकारी यांचा आला असून त्यास तृतीय पारितोषिक रु. 200/- हे रोख स्वरूपात देण्यात आले.     सदरची  वादविवाद स्पर्धा यशस्वी करण्याकरिता पी.एन.पी. कॉलेज एनएनएस समन्वयक प्रा. रवींद्र पाटील व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील  जिल्हा  आयसीटीसी पर्यवेक्षक श्री. नवनाथ लबडे, एसटीडी समुपदेशक श्री. अनिल खंडाळे, समुपदेशक श्रीम. कल्पना गाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. अमित सोनवणे, श्री. रोहन रत्नाकर एचएलएल,   वाहनचालक किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.