अलिबाग

बलशाली लोकशाही करीता मतदार साक्षरता हे घोषवाक्य डोेळ्यासमोर ठेऊन नागरीकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार महोत्सव साजरा करणे, निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहीती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने यांनी  पत्रकार परीषदेत दिली.

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दरवर्षी प्रमाणे दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणेत येत आहे. या दिवसासाठी बलशाळी लोकशाही घडविण्याचा हा विषय आयोगाने निश्‍चिल केलेला आहे, सदर कार्यक्रम जिल्हा स्तरावर, मतदार संघस्तरावर, तालुका स्तरावर व मतदान केंद्रस्तरावर साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिवसाची मराठी भाषेतील शपथ घेणे नविन नोंदणी झालेल्या मतदारांना बंच वितरीत करणे, मतदार नोंदणी जागृती बाबत चित्रफित दाखविणे, युवक मतदार महोत्सव साजरा करणे, निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेणेत येणार आहेत. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर तसेच मतदारसंघ स्तरावर शाळा,कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचेे आयोजन करण्यात आले असून,सदर स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यक्रम दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता पी. एन. पी नाटयगृह,अलिबाग बायपास रोड येथे आयोजित करण्यात आला असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने यांनी  सांगितले.

25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8.00 वाजता जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल,अलिबाग ते पी. एन. पी नाटयगृह,अलिबाग बाईपास रोड या मार्गे शालेय विद्यार्थी, एन.सी. सी. एन. एस. एस.स्काऊट गाईड तसेच भावी युवा मतदार यांचे रेलीचे आयोजन करण्यात आले आहे.  निवडणूक व मतदान विषयावर आधारित निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला,रांगोळी स्पर्धा यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मतदार यादी संदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. तर 10 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने महिला,युवक,अपंग व्यक्ती,जेष्ठ नागरिक,सेनादलातील मतदार,अनिवासी भारतीय तसेच समाजातील दुर्क्षोत घटक यांना सदर कार्यक्रमात समाविष्ट करुन घेण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व शाळा व कॉलेज यांमध्ये निवडणूक साक्षरता बलब  मतदान केंद्र स्तरावरील चुनाव पाठशाळा,शासकीय/निमशासकीय कार्यालयामधील त-ऋ यांच्या माध्यमातून मतदार साक्षरता कार्यक्रम घेणेत येत आहेत.

जिल्हयातील सर्व नागरिकांनी 10 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.