खोपोली

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झालेल्या अपघात ग्रस्त टँकरचा फायर रिपोर्ट घेण्यासाठी  नगरपालिका  निर्धारित चलन रक्कम  व्यतिरिक्त , अतिरिक्त तीन हजार रुपयाची लाच घेताना खोपोली अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍याला साफळा रचून रंगगेहाथ पकडण्यात आले .या संबंधी सोमवारी रात्री उशिरा  खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून , आरोपी नगरपालिका कर्मचारी मोहन धारू मोरे वय 47 यांस अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत  विभागाच्या कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.
तक्रारदार यांचा टँकर ने  केमिकल वाहून नेण्याचा व्यवसाय आहे.  त्यांचा टँकर (क्रमांक एम एच 48 . एजी 7145) हा मुंबई पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर 19 डिसेंबर रोजी एका ट्रेलरला ठोकर मारून खालापुर तालुक्यातील ढेकु गावच्या हद्दीत अपघात  ग्रस्त होऊन पूर्णपणे जळून गेला होता . त्यानंतर  इन्शुरन्स मिळण्यासाठी व अन्य कायदेशीर पूर्तता करण्यासाठी सदर टँकरचा  फायर रिपोर्ट साठी तक्रारदार यांनी खोपोली अग्निशमन कार्यालयकडे फायर रिपोर्ट मिळण्याची  मागणी केली होती. या रिपोर्ट साठी नगरपालिका कडून  दोन हजार रुपये फी निर्धारित  केलेली आहे.  त्याचे रीतसर चलन पावती ही देण्यात येते  . मात्र नगरपालिका कर्मचारी तथा उप अग्निशमन अधिकारी मोहन मोरे यांनी दोन हजार  व्यतिरिक्त,  अतिरिक्त  तीन हजार रुपये लाचेची  मागणी केली .

या संदर्भात पडताळणी करून , नवी मुंबई लाचलुचपत अधिकार्‍यांनी सोमवारी संध्याकाळी  साफळा लावून  लाचेची तीन हजार रक्कम स्वीकारताना  खोपोली अग्निशमन कार्यालयातील कर्मचारी मोहन मोरे याला ताब्यात घेतले. त्या नंतर चौकशी करून सोमवारी रात्री उशिरा मोहन मोरे याच्या विरोधात खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक टीमने ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस उपअधीक्षक रमेश चव्हाण ,  पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या पथकाने केली. नागरिकांनी अशा प्रकारच्या तक्रारी देण्यासाठी पुढे यावे असे आव्हान ही या अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.
 
 
 
 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.