अलिबाग 

पनवेल तालुक्यातील तळोजा येथे गुटख्याची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करत तब्बल 80 लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी पकडला आहे. याप्रकरणी वाहनचालक तसेच त्यावाहनांचे मालक यांच्यावरही गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.

9 जानेवारी, 2020 रोजी पनवेल तालुक्यातील किरवली टोलनाका, तळोजा  परिसरात अन्न व औषध प्रशासन म.रा.पेण-रायगड व वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकार्‍यांनी गुप्त माहितीवरुन प्रतिबंधित गुटखा व पान मसाला या अन्नपदार्थाची वाहतूक करणार्‍या दोन ट्रक-टाटा आयशर ट्रक (क्र.एम.एच.04, एफ.डी.-9953 आणि ट्रक क्र.एम.एच.04, एच.वाय.-3889 ) या वाहनातून मधून रु.78,45,024/- चा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करुन दोन्ही ट्रकवर जप्तीचा कारवाई केली.

या  प्रकरणी वाहनचालक, वाहन मालक व पुरवठादार या आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व भा.दं.वि.कलम 328, 188, 273 व 274 अंतर्गत तळोजा पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल दाखल केला असून पुढील तपास चौकशी सुरु आहे. त्याच प्रमाणे प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वरील दोन्ही ट्रकचे  वाहतूक परवाने रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई जि.पालघर यांना कळविण्यात आले आहे.

सदरची कारवाई शिवाजी देसाई, सह आयुक्त (अन्न) ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) लं.अ.दराडे, यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बा.औ.शिंदे, श्रीमती सु.ना.जगताप व श्रीमती प्रियंका भंडारकर यांनी कार्यालयातील कर्मचारी, प्र.मा.पवार, वरिष्ठ लिपिक ना.द.वस्त, दे.मो.पाटील, म.भि.भगत यांच्या मदतीने कार्यवाही केली आहे..

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.