दिनांक 21 जानेवारी 2020 

इतर दिनविशेष :

* 1506 - व्हॅटिकन सिटीत सैन्यदल स्थापना.

* 1609 - फ्रेंच संशोधक जोसेफ जस्टस स्कॅरलिगर यांचे

   निधन.

* 1593 - अनियंत्रित राजा 16वा लुईला जाहिर फाशी

   झाली.

* 1854 - उपहास काव्य जनक गंगाधर मोगरे यांचा जन्म

* 1119- कबी यशवंताची ’आई’ ही गाजलेली कविता या

   दिवशी लिहिली.

* 1924 - कोकण रेल्वे शिल्पकार मधु दंडवते यांचा जन्म.

क्लेटमॉव्ह शाळेचे नाव बदलून 14 वा लुई स्कूल या नव्या नावाच्या नामकरण सोहळ्यास खुद्द 14 वा लुई आला होता. तेव्हा त्या शाळेतील एक नऊ वर्षांचा मुलगा बोलला, नाव बदलण्याची गरज काय ? क्लेटमॉव्ह म्हणजे डोक्याला टक्कल. ते तर आपल्य राजाला आहेच. त्याच्या बोलण्याला ती चिल्लीपिल्ली हसली. लुईला हे  समजल्यावर त्याने त्या मुलाची रवानगी बॅल्टिनच्या तुरुंगातल्या अंधारकोठडीत केली. ते साल होते 1674 व त्याची सुटका झाली इ. स.1744 मध्ये. तब्बल 70  वर्षे तुरुंगात. त्याचे आई, वडील व इतर कोणतेच नातेवाईक लुईने जिवंत ठेवले नव्हते. लक्षाधीश असलेला तो मुलगा दरिद्री अवस्थेत मेला. ह्या एका घटनेवरून फ्रान्सचे लुई घराणे किती विक्षिप्त होते हे लक्षात येते. अशा जुलमी आणि अनियंत्रित राजसत्तेच्या हाताखाली फ्रेंच जनता चिरडली जात होती. इ. स. 11715  मध्ये 14 वा लुई मेला. पुढे 15 व्या लुईने चैन आणि विलासाच्या भौतिक सुखात इ. स. 1774 मध्ये फ्रान्स सोडले.

1774  साली 16 वा लूई फ्रान्सच्या गादीवर आल्यावर त्याने आपल्या पित्याचा व आज्याचा वारसा  चालविण्याची शपथ घेतली. आपली अतिशय सुंदर असलेली पत्नी मेरी अ‍ॅन्टाइनेट हिच्या हातातला तो बाहुला बनला होता. राजा-राणी व्हर्सायच्या राजवाड्यात भूतलावरच्या सर्व भौतिक सुखामध्ये लोळण घेत होते. 15 हजार नोकर माणसे, 217 वाहने त्यांच्या दिमतीस होती. त्यांच्याबरोबरच धर्मगुरु, उमराव, सरंजामदार हेही मोठ्या संख्येने व्हर्सायच्या राजवाड्यात जनतेच्या पैशांवर सुखाने लोण घेत होती. सामान्य लोक मात्र नासके बटाटे, कोंडा, वेळ पडली तर गवतही उकडून खात असत. तसे पाहिले तर युरोपच्या राजकारणात फ्रेंचचा दबदबा होता. पॅरिस हे युरोपचे सांस्कृतिक केंद्र महणून ओळखले जायचे. परंतु लुई राजाच्या उधळपट्टीमुळे फ्रान्सवर 300  कोटी फ्रँकसचे कर्ज झाले. लष्करातही भ्रष्टाचार पसरल्यामुळे इंग्लंडबरोबर झालेल्या सप्त्वार्षिक युद्धात फ्रान्सला  मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. परिणामी असंतोष वाढत गेला. यातूल काही उपाययोजना करायच्या सोडून उलट तिसर्‍या वर्गावर आणखी कराचा बोजा लादला. यामधून काही मार्ग काढण्यासाठी 16 व्या लुईने अनेक अर्थमंत्री बदलले तथापि प्रत्येक अर्थमंत्र्याने उमराव, धर्मगुरुंवर कर लादल्याशिवाय फ्रान्सची स्थिती सुधारणार नाही हे  सांगितल्यामुळे त्या सर्व अर्थमंत्र्याना डच्चूदिला. जनतेत असंतोष वाढला.

जनतेच्या असंतोषाचा हा दारूगोळा तोफेत ठासून भरला होता. फक्त त्या तोफेला टिणगी देण्याचे बाकी  होते. ही ठिणगी रूसो, व्हॉल्टेअर या विचारवंतांनी दिली. फ्रान्सचा हा अआर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी 16व्या लुईने थोड्याफार प्रमाणात निश्‍चित प्रयत्न केले. अर्थमंत्री नेकरच्या सांगण्यावरून तब्बल 155 वर्षानी इस्टेट जनरलची सभा (लोकसभा) भरवली. तथापि उमरावांवर कर लादण्याचा नेकरचा सल्ला त्यांनी धुडकावला.

इस्टेट जनरलच्या अधिवेशनात पहिल्या दोन वर्गाच्या प्रतिनिधींनी तिसर्‍या वर्गाच्या प्रतिनिधिंसोबत बसण्यास नकार दिला. तेव्हा आपणच राष्ट्रीय सभेचे खरे खुरे प्रतिनिधी आहोत असे नेकरने निक्षून सांगितले आणि राजवाड्यासमोर असणार्‍या टेनिस कोर्टवर फ्रान्समध्ये प्रजासत्ताक स्थापण्याची शपथ घेतली. या घटनेमुळे राजाने नेकरला अर्धमंत्री पदावरून काढून टाकले. त्यातच भुकेकंगाल लोकांचा एक मोर्चा आम्हांला ब्रेड द्या अशी मागणी करत राजवाड्यावर आला असताना राणीने भाकरी मिळत नसेल तर केक खा’ असे संतापजनक उद्दार काढल्यामुळे पॅरिस शहरात असंतोष निर्माण होऊन जनतेने बॅस्टिलचा जुलूम आणि अन्यायाचे प्रतीक असलेला तुरुंग फोडून हजारो कैद्यांना मुक्त केले. राजाच्या सैनिकांनी जनतेवर गोळ्या घालण्याचा हुकूम मानला नाही, तेव्हा लुईने म्हटले, हे बंड आहे. तेव्हा त्याच्या मंत्र्याने उत्तर दिले महाराज, हे बंड नव्हे, ही क्रांती आहे. या घटनेमुळे 16 व्या लुईला धक्का बसला.

‘क्रांती चिरायू होवो’ अशा घोषणा फ्रान्सच्या रसत्यावर ऐकू येऊ लागल्या. राजाला, विशेषत: मेरी अन्टाइनेटला हा आपला अपमान वाटला. राजाने परदेशी भाडोत्री सैन्य उभारून क्रंती चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा हजारोंच्या संख्येचा जनसमुदाय राजवाड्यावर चालून आला तेव्हा मुकाट्याने राजा त्यांच्या स्वाधीन झाला.

‘बेकरीवाला, त्याची पत्नी व मुले आमच्या ताब्यात आहेत. आता आम्हाला ब्रेड़ मिळणार’ अशा घोषणा लोक देत हाते. राजाला नजरकैदेत ठेवण्यात आले. 20 जून, 1781 रोजी राजा व राणीने नोकराच्या वेशात पलायन केले. पलायनामुले राजाबद्ल जनतेत जो काही थोडाफार आदर होता तो साफ उतरला. तो सापडल्यावर त्याची धिंड काढण्यात आली. अशा प्रकारे राजघराणे अडचणीत असताना 16व्या लुईच्या भावाने मी ऑस्ट्रीयाच्या मदतीने फ्रान्सवर हल्ला करून पुन्हा लुई घराण्याची सत्ता फ्रान्समध्ये स्थापन करेन, अशी घोषणा केली गेली. त्यामुळे राजाचे सर्व अधिकार काढून कायदेमंडाने त्याला पदच्युत केले.

16 वा लुई व त्याचे कुटुंबव कैदेत असले तरी त्यांच्या गुप्त हालचाली चालूच होत्या. राजपद नष्ट झाले होते. आता राजा काय उपयोगाचा ? तेव्हा जेकोबिन गटचे नेते रॉबेस्पिअर  व डॅन्टन यांनी राजावर देशद्रोहाचा आरोप ठेवून खटला भरला आणि राजाला फाशीची शिक्षा फर्मावली. 21 जानेवारी, 1793 रोजी हजारोंच्या उपस्थितीत त्याला फाशी दिली. फाशी देण्यापूर्वी तो एवढेच म्हणाला, ‘सभ्य गृह्थोहो, मी पूर्णपणे निरपराध आहे. तथापि त्याच्या या उद्गारावर क्रांतीकारकांचा पुढारी डॅन्टन राजाला उत्तर देताना म्हणाला, युरोपातील राजे लोकांनी आम्हाला दमदाटी देउन लढाईचे आव्हान देण्याचे धाडस केले अआहे. पण आता घ्या हे एका राजाचे मुंडके उत्तरादाखल आम्ही त्यांना सादर करत आहोत!

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.