सडकेचा विशिष्ट भाग जिथे वापरला जातो, तिथे हे संकेत अनिवार्य आहेत. हे संकेत काय करायचे व काय नाही करायचे असे दाखवतात. आवश्यक सडक चिन्हे साधारणपणे वर्तुळाकार असून, त्यांना लाल किनार असते. त्यातले काही निळेही असतात. ङ्गथांबाफ अन् ङ्गमार्ग द्याफ हे क्रमशः अष्टकोनी व त्रिकोणी आकारचे असतात. यांचे उल्लंघन करणार्‍यास भारी दंड व शिक्षा होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, याचे उल्लंघन केल्याने मोठे अपघातही होऊ शकतात. 

थांबा- हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि ठळक सडक संकेत आहे. संकेताप्रमाणे चालकाने एकदम वाहन थांबवावे. साधारणपणे पोलीस, वाहतूक आणि टोल अधिकारी हे संकेत वापरतात. मार्ग द्या- हे संकेत चौकात लावलेले असतात. जिथे विशिष्ट रेषेत वाहतूक शिस्त ठेवावी लागते. हे संकेत बरोबरीच्या वाहनांना उजवीकडे मार्ग देण्यासाठी असतात. प्रवेश निषेध- हे संकेत कुठल्याही वाहनांना प्रवेश नसल्याचे दर्शवितात. काही भागातले काही खंड किंवा रस्ते ङ्गप्रवेश नाहीफ असे निर्धारित केले असतात. इथे प्रवेश सीमित असू शकतात किंवा हे वाहन रहदारीमुक्त क्षेत्रही असू शकते. येणार्‍या वाहनांना प्राथमिकता- रस्त्याच्या सुरूवातीला असणारा हा संकेत येणार्‍या वाहनांना प्राथमिकता देण्याबद्दल दर्शवितो. निमुळत्या रस्त्यावर जिथे वाहतूक कठीण किंवा शक्य नसते, तिथे वाहतुकीचे नियमन प्राथमिकतेप्रमाणे केले जाते. तिथे एका विशिष्ट दिशेने जाणार्‍या वाहतुकीला प्राथमिकता देऊन हे नियमन केले जाते. वाहतुकीचे दिवे लावून नाही. हा संकेत प्राथमिकता नसणार्‍या वाहतुकीच्या बाजूने दाखवला जातो. ज्या बाजूला हा संकेत असतो, त्या बाजूची वाहतूक तेव्हाच सुरू होईल, जेव्हा समोरून येणारी वाहतूक नसेल. सर्व मोटार वाहने प्रतिबंधित- हे संकेत दाखवतात की त्या भागाच्या आतली किंवा बाहेरची सर्व वाहने प्रतिबाधित आहेत. त्या भागाला मोकळेपणा द्यायला हे केले जाते. हे पादचारी क्षेत्र म्हणून वापरले जाते. ट्रक प्रतिबंधित - संकेताप्रमाणे या ठरलेल्या भागात ट्रक किंवा एचएमव्ही ना प्रतिबंध असतो. हे निमुळते क्षेत्र असू शकते किंवा इथे जास्त रहदारी असू शकते, तिथे भारी वाहन गाड्यांनी रस्त्यांची वाहतुकीस अडथळा येऊ शकतो. बैलगाड्या व हातगाड्या प्रतिबंधित- हे संकेत दर्शवितात की या मार्गावर बैलगाड्या व हातगाड्या प्रतिबंधित आहेत. हळू चालणारी ही वाहने अनेक वेळा वाहन प्रवाह रूढ होतो. बैलगाड्या प्रतिबंधित- परिवहनांचे सर्वात मंदगती साधन- बैलगाड्या बर्‍याचवेळा वाहतूक सरळ प्रवाह अवरुद्ध करतात म्हणून काही क्षेत्रे बैलगाड्यांसाठी निषिद्ध करतात. टांगे प्रतिबंधित- टांगे किंवा घोडागाड्या आता आतापर्यंत परिवहनाचे लोकप्रिय साधन होते. परिवाहनाची नवी आणि जलद गती साधन असल्याने या वाहनाने  आता वाहतुकीत व्यत्यय येतो. काही क्षेत्रे टांग्यांसाठी प्रतिबंधित आहेत. हातगाड्या प्रतिबंधित - हा संकेत चिन्हित मार्गावर हातगाड्या प्रतिबंधित असल्याचे दाखवतो, कारण त्यामुळे जलदगती परिवहनात व्यत्यय येतो. सायकल प्रतिबंधित- सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी जलद गती परिवाहनातले काही मार्ग सायकलींसाठी प्रतिबंधित केले जातात. हा संकेत असलेल्या रस्त्यावरुन सायकलस्वारांनी जाऊ नये. पादचारी प्रतिबंधित- हे संकेत त्या मार्गावर किंवा क्षेत्रात पादचारी वाहतूक प्रतिबंधित करतात. हे जलद गती वाहतुकीच्या लेनसाठी किंवा  राजमार्ग इ.वर असू शकते. पर्यायी पारगमन व्यवस्था जसे उपमार्ग, पादचारी पूल इ. असणार्‍या चौकांच्या ठिकाणी हे संकेत लावले असू शकतात. उजवीकडचे वळण प्रतिबंधित - हा संकेत कोणत्याही परिस्थितीत उजवीकडे न वळण्याचे वाहनचालकाला दर्शवितो. डावीकडचे वळण प्रतिबंधित - हा संकेत डावीकडेच वळण प्रतिबंधित असल्याचे दर्शवितो. यू-टर्न प्रतिबंधित- हा संकेत काही व्यस्त चौकात दिसतो. व्यस्त चौकात यू-टर्न केल्याने मोठे अपघात होऊ शकतात किंवा वाहतूक अवरूद्ध होऊ शकते. दंड आणि कुठलाही अपघात टाळण्यासाठी वाहनचालकाने या संकेताचे उल्लंघन करू नये.  ओव्हरटेकिंग प्रतिबंधित- हायवे व अ‍ॅटोमोबाइल टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे वाहनांची गती वाढली जाते. त्यामुळे रस्त्यावर ओव्हरटेकिंग फार महत्त्वाचे झाले आहे. निमुळते रस्ते, पूल, वळणांवर ओव्हरटेकिंग फार घातकी झाले आहे. अशा ठिकाणी हा संकेत लावल्याने ओव्हरटेकिंग प्रतिबंधित होऊन सुरक्षित देता येते. हॉर्न प्रतिबंंधित - आधुनिक काळात अति आणि अनावश्यक हॉर्न उदंड वागणे समजले जाते. तरीही काळी ठिकाणी शातंता क्षेत्र ठरवली गेली आहेत. जसे इस्पितळं, शाळा वगैरे हा संकेत वाहन चालकांना शांतता क्षेत्राची मर्यादा राखून हॉर्न न वाजण्याची सूचना देतो. रुंदी सीमा- हा संकेत पुढील क्षेत्रात जाऊ शकणार्‍या वाहनांच्या रुंदीबद्दल सूचना देतो. दोन मीटरपेक्षा जास्त रुंद वाहने या क्षेत्रात प्रतिबंधित आहेत, हे क्षेत्र निमुळती लेन किंवा पूल असू शकतो. उंची सीमा- काही रस्ते कमी उंचीच्या ठिकाणाहून उदा. पूल, रेल्वे लाईन खालून जातात. अनिष्ट टाळण्यासाठी प्राधिकरण पुलाखालून निघू शकणार्‍या वाहनांची उंची निश्‍चित करते. अपघात आणि दंड टाळण्यासाठी ठराविक उंचीची सीमा निक्षून पाळणे आवश्यक आहे. लांबी सीमा- हा संकेत ठराविक क्षेत्रातून जाऊ शकणार्‍या वाहनांची लांबी दाखवतो. हे एक तीक्ष्ण वळण, पिन वळण इ. ही असू शकते, हा संकेत लांब आणि विशाल गाड्यांसाठी असतो. वजन सीमा- रस्त्यावर चालणार्‍या वाहनांचे वजन सीमा दाखवणारा हा संकेत आहे. हा संकेत दाखवतो, की पाच टनपेक्षा अधिक वजन असलेल्या गाड्या ह्या रस्त्यावर जाऊ शकत नाही, कारण पुढे असणारा पूल एवढे पेलू शकत नाही किंवा रस्ता नरम असून, एवढे वजन सहन करू शकत नाही. एक्सल वजन सीमा- हा संकेत साधारणपणे पुलाच्या आधी लावला असतो. पूल किती वजन पेलू शकतो हे या संकेताने कळते. या संकेताची सीमा 4 टन आहे. याचा अर्थ, फक्त तीच वाहने ज्यांचे एक्सल वजन 4 टन किंवा त्यापेक्षा कमी असेल पुलावरून जाऊ शकतात. गतिसीमा - हा संकेत रस्त्यावर वाहनांची गती निर्धारित करतो. रस्त्यावर अपघात व दंड टाळण्यासाठी ठरवून दिलेली सीमा पाळायलाच हवी. नो पार्किंग- मोठ्या शहरांमध्ये हा संकेत फार ठळक असतो. ठराविक क्षेत्रांत पार्किंग करायचे नाही, अशी सूचना हा संकेत देत असतो. या क्षेत्रात पार्क केलेेले कुठलेही वाहन उचलले जाऊ शकते व मालक किंवा चालकाला दंड भरावा लागू शकतो. म्हणून चालकांनो, गाड्या निर्धारित क्षेत्रातच पार्क कराव्या. थांबू किंवा वाट बघू नये - काही रस्त्यांवर वाहती वाहतूक हवी असते आणि एका वाहनाच्या थांबण्याने संपूर्ण वाहतूक गडबडते. अशा ठिकाणी ङ्गथांबू नयेफ संकेत लावतात. अशा ठिकाणी थांबलेेल्या गाड्यांना अपघात होऊ शकतो किंवा काही कारवाई केली जाऊ शकते. आवश्यक डावे वळण (उजवे जर संकेत उलटा असला तर)- संकेत बघून डावीकडे वळावे. हे पथांतरणामुळे करावे लागले असू शकते. आवश्यक पुढे (फक्त पुढे) - वाहतुकीने पुढे जावे व कोणतेही वळण घेतल्यास दंड होऊ शकतो  व सुरक्षिततेसाठी धोका ठरू शकतो, असे हा संकेत सूचित करतो. पुढे आवश्यक उजवे वळण (डावे जर संकेत उलटा असला तर) - हा संकेत चालकाला फक्त उजवीकडे वळण्यास निर्देश देतो. हा संकेत पाळल्याने सुरक्षित आणि सुखदायी प्रवास होतो. आवश्यक पुढे किंवा उजवे वळण - हा संकेत वाहतुकीला सरळ पुढे जाण्यास किंवा उजवीकडे वळण्यास निर्देश देतो. वळण प्रतिबंधित आहे. 

तुम्ही जिथेही हा संकेत बघाल तिथे येणार्‍या वाहतुकीला तुमचे अस्तित्व कळण्यासाठी हॉर्न वाजवा.  आवश्यक कमीत कमी गतिसीमा - रस्त्याच्या सुरुवातीला जिथे हा संकेत लावला आहे तिथून पुढे त्या रस्त्यावर जाणारी वाहने कमीत कमी निर्देशिलेल्या गतीने वाहने चालवतील. दंड आणि अपघात टाळायला गतिसीमा काटेकोरपणे पाळायला हवी. प्रतिबंध अंत - रस्त्यावर संकेतद्वारे लागणारे प्रतिबंध इथे संपतात. या विशिष्ट जागेपुढे संकेताद्वारे लावलेले प्रतिबंध संपतात असे हे संकेत दाखवतात. तरीही वाहनचालकांनी बेसावध असू नये व अपघात टाळण्यासाठी सर्व सावधगिरी बाळगावी.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग