पनवेल 

ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांचे वडील स्वर्गीय बाबू हशा पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी भोकरपाडा येथील आझाद मैदानावर ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. शुक्रवारी (दि.17) मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. 

स्वर्गीय बाबू हशा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित सामन्यांचे संपूर्ण आयोजन जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा आणि स्वर्गीय बाबू हशा पाटील शैक्षणिक, क्रीडा कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येते. 17 ते 21 जानेवारी असे सहा दिवस हे सामने नॉकआऊट धर्तीवर खेळवण्यात येतील. यात प्रथम क्रमांकाच्या संघाला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे, तर रनर अप संघाला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांनासुद्धा रोख रुपये 25 हजार देऊन गौरविण्यात येईल. मालिकावीरासाठी मोटारसायकल  तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना एयर कुलर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. 

या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे साई प्रित लाईव्ह सर्व्हिसेसच्या माध्यमातून या स्पर्धा यू ट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केल्या जात आहेत. पहिल्या दोन दिवसांतच 

हजारो क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेचा आनंद लाईव्ह सामने पाहून घेतला.

21 जानेवारी रोजी सायंकाळी अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि पनवेल इंडस्ट्रिअल इस्टेटचे चेअरमन विजयराव लोखंडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील.

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग