माणगाव

 माणगाव नगरपंचायत विषय सामिती सभापतींची निवडणूक प्रक्रिय नगरपंच्यात कार्यालयात निवडणुकीच्या पीठासन अधिकारी तथा माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे यांच्या अधिपत्याखाली व नागरपंचातीच्या नगराध्यक्ष योगिता चव्हाण, प्रभारी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत बिनविरोध घेण्यात आली.

 नगरपंचायतीच्या बांधकाम व नियोजन समिती सभापतीपदी उपनगरध्यक्ष शुभांगी उद्धव जाधव,पाणीपुरवठा व सामाजिक न्याय समिती सभापतीपदी जयंत महादेव बोडेरे,स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी रत्नाकर बाळाराम  उभारे ,दिवाबत्ती शिक्षण क्रीडा व युवक कल्याण समिती सभापतीपदी हर्षदा सतिष सोंडकर,महिला व बालकल्याण सामिती सभापतीपदी माधुरी रवींद्र मोरे व उपसभापतीपदी सानिया मयूर शेठ यांची  निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होताच नगरपंचायत कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.       विषय समिती सभापतीपदी व उपसभापतीपदी  बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नगरसेवक,नगरसेविका यांचे खा.सुनील तटकरे,ना.आदिती तटकरे,आ. अनिकेत तटकरे यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

 

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग