कर्जत

 कर्जत तालुक्यातील ऐनाची वाडी, बाटलाची वाडी, कोतलाची वाडी, डामसे वाडी , नारळाची वाडी, वाघाचीवाडी या आदिवासी वाडीतील दीडशे महिलांना वॉटर व्हील ड्रमचे मोफत वाटप करण्यात आले.

ऑल कार्गो लॉजिस्टिक लिमिटेड कंपनी च्या अवश्या फाउंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने जीवन अशा कम्युनिटी सेंटर तिवरे येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

कर्जत तालुक्यात सन 2015 पासून ऑल कार्गो लॉजिस्टिक लिमिटेड कंपनी च्या अवश्या फाउंडेशन तसेच लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू आहे.  या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांना आतापर्यंत 1 लाख 72 हजार फळझाडांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना स्वावलंबी जगण्याचे माध्यम निर्माण झाले आहे. याचा लाभ आतापर्यंत 4 हजार 40 शेतकर्‍यांना झाला आहे. या फळझाडांची चांगल्या प्रकारे निघा येथील आदिवासी बांधवांनी विशेषता महिलांनी राखली आहे ही फळझाडे वाढवताना महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. याशिवाय महिलांच्या डोक्यावर पाण्याची जड भांडी घेऊन दोन-तीन किलोमीटर अंतरावर जाऊन हे पाणी आणावे लागत होते. अशा महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा भार कमी करण्यासाठी आत्तापर्यंत बाराशे वॉटर व्हील ड्रम चे वाटप करण्यात आले होते. या वॉटर व्हील ड्रमची उपयुक्तता लक्षात घेऊन याचा लाभ अधिकाधीक माहिलांना व्हावा म्हणून आज 150 महिलांना वॉटर व्हील ड्रम चे वाटप करण्यात आले.  या एका ड्रममध्ये 45 लिटर पाण्याचा साठा असून हे ड्रम सहज हाताने ओढून नेता येतात त्यामुळे महिलांना डोक्यावर पाणी भरण्याचा त्रास हा कमी होणार असल्याची माहिती डॉक्टर निलरतन शेंडे यांनी दिली. 

या कार्यक्रमात डॉ. नीलरतन शेंडे,  अजय सक्सेना, विदेशी पाहुणे टॉम डॅविस तसेच गौतम कनोजे,  कन्हैया सोमणे,  विद्यानंद ओव्हाळ आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती प्रकल्पाच्या अ‍ॅग्रीकल्चर टीमचे मयूर माळी ,सागर केवारी, वैभव पाटील, सुरज आगिवले, दशरथ नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.