जेएनपीटी

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण केल्या प्रकरणी कोपर, गव्हाण येथिल दोघांना जेलची हवा खावी लागली आहे. विजय हिरा घरत (57) आणि रोशन हिरालाल म्हात्रे (36) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. महावितरण तर्फे कोपर गावात नवीन वीजेचे खांब बसविण्याचे काम सरू होते. यावेळी ठेकेदाराने कोपर प्राथमिक शाळेजवळ एक पोल उभा केला होता. मात्र हा पोल येथे का उभा केला अशी विचारणी करून विजय घरत यांनी ठेकेदाराला दमदाटी केल्याने महावितरणचे सहाय्यक अभियंता रणजित देशमुख तेथे आले त्यावेळी विजय घरत यांनी देशमुख यांना मारहाण केली तर या घटनेचे मोबाईल द्वारे चित्रिकरण केले म्हणून रोशन म्हात्रे यांनी त्यांचा मोबाईल फोडला. सरकारी कामात अडथळा निर्माण करून लोकसेवक असलेल्या फिर्यादी यांना मारहाण केल्याबद्दल न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षिका ज्योती गायकवाड हे न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव व गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहे.

 

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.