पनवेल 

 भरधाव टेम्पोने पळस्पे गावाजवळ शाळा सुटल्यावर घरी परतणार्या 10 वी तील 3 विद्यार्थीनींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात 3 विद्यार्थींपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघी जणींना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली आहे.

पनवेल जवळील पळस्पे गावाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात 10 वी इयत्तेत शिकणार्या काजल गायकवाड, मिनल चौधरी व स्वप्नाली ठोंबरे (तिघेही रा.कुडावे गाव) या शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यावर घरी परतत असताना अचानकपणे भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोवरील चालकाने सदर 3 मुलींना जोरदारपणे धडक दिली. या अपघातात काजल गायकवाड ही गंभीररित्या जखमी झाली व त्यात तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघी जणी जखमी झाल्या असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीमध्ये सदर टेम्पो चालकाने मद्यपान केल्याचे समजते. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

 

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.