जेएनपीटी 

 उरण पनवेल मार्गावर जासई गावाजवळील आरके कंपनीच्या गेट समोर एका भरधाव ट्रेलरने एका इसमाला उडविले. यामध्ये त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. त्रिभूवन घरत (64) रा. भेंडखळ असे या इसमाचे नाव आहे. अपघातानंतर चालकाने गाडी घेवून पलायन केले. या अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या बाबत उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक व्ही.जी. कावळे हे याबाबत अधिक तपास करत आहेत. अपघात केलेल्या ट्रेलरची ओळख पटली असून लवकरच चालकाला अटक केली जाईल असे तपास अधिकारी व्ही.जी. कावळे यांनी सांगितले.

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.